आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लूक रिव्हिल:आलिया भट्टने वाढदिवशी दिले चाहत्यांना खास सरप्राईज, बिग बजेट 'RRR' मध्ये साकारणार सीता; फर्स्ट लूक केला रिलीज

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटात आलियाचे नाव सीता असणार आहे.

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट 'बाहुबली' फेम दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या आगामी ‘आरआरआर’ चित्रपटामध्ये सीतेची भूमिका साकारणार आहे. आलियाच्या वाढदिवशी म्हणजे आज (15 मार्च) या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यात आलिया अतिशय सुंदर दिसत असून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. आलियाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर करत 'सीता' असे कॅप्शन त्याला दिले आहे.

या चित्रपटात आलियाचे नाव सीता असणार आहे. या चित्रपटात तिच्यासह ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. आरआरआर हा पीरियड ड्रामा असून या चित्रपटाद्वारे आलिया दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. यापूर्वी निर्मात्यांनी आलियाची एक पाठमोरी झलक समोर आणली होती. शेअर केलेल्या फोटोत आलिया एका ब्लॅक शेडेड जागेवर पाठमोरी बसलेली दिसतेय. आणि समोर श्री रामाची मुर्ती दिसतेय.

  • 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे चित्रपट

‘आरआरआर’ हा चित्रपट 10 भाषांमध्ये प्रदर्शित होईल. यावर्षी 13 ऑक्टोबर रोजी दस-याच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आरआरआरला तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळमच्या थिएट्रिकल राइट्ससाठी एकूण 348 कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे. आलिया भट्ट, राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर व्यतिरिक्त या चित्रपटात अजय देवगण, श्रिया सरन, समुथिरकानी आणि अ‍ॅलिसन डूडी यांच्यासह अनेक भारतीय प्रसिद्ध कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. हा सर्वात मोठा हिट भारतीय चित्रपट ठरणार आहे.

  • कोरोनामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती

डीव्हीव्ही एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवला जात आहे. हा चित्रपट 1920 च्या दशकातील क्रांतिकारक अल्लुरी सीतारामा राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे. हा मल्टीस्टारर पीरियड ड्रामा यापूर्वी 8 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता 13 ऑक्टोबर 2021 ही प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

  • 450 कोटींच्या बजेटमध्ये बनतोय 'आरआरआर'

'आरआरआर' हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नडसह 10 भाषांमध्ये प्रदर्शित होईल. रिपोर्ट्सनुसार राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर सध्या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीक्वेन्सचे शूटिंग करत आहेत. 'बाहुबली' सारखी सुपरहिट सीरिज बनवणा-या राजामौलींचा 'आरआरआर' हा चित्रपट तब्बल 450 कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये तयार होत आहे.

बातम्या आणखी आहेत...