आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रतिष्ठित 95 व्या अकादमी पुरस्कारांच्या 23 विभागांच्या नामांकनांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. ओरिजनल साँग्ज कॅटेगरीत आरआरआर या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला नामांकन मिळाले आहे. तर भारतातर्फे ऑस्करसाठी पाठविण्यात आलेला ‘छेल्लो शो’ मात्र बाद झाला आहे. 'ऑल दॅट ब्रेथ्स' आणि 'द एलिफंट व्हिस्परर्स' या भारतीय माहितीपटांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म आणि सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे.
रिहाना, लेडी गागा, सोफिया कार्सन या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या गायकांच्या गाण्यांशी ‘नाटू नाटू’ची स्पर्धा आहे. एम. एम. कीरावानी यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे तर कालभैरव-राहुल सिप्लिगुंज यांनी याचे बोल लिहिले आहेत. याआधी ‘गोल्डन ग्लोब’ आणि ‘क्रिटिक चॉईस’ हे दोन महत्त्वाचे अमेरिकी अवॉर्ड्स 'नाटू नाटू या गाण्याने पटकावले आहेत.
भारतीय चित्रपटांना नामांकन नाही
भारताची अधिकृत एन्ट्री असलेला ‘छेल्लो शो’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘कांतारा’ चित्रपटही ऑस्करच्या नामांकन यादीत स्थान मिळवू शकले नाहीत. त्यामुळे हे सर्व चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. भारताची अधिकृत एंट्री ‘छेल्लो शो’ला सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीमध्ये निवडण्यात आले होते, परंतु अंतिम नामांकनांमध्ये तो ‘अर्जेंटिना 1985’ चित्रपटाकडून पराभूत झाला आणि यादीतून बाहेर झाला.
11 नामांकनांसह एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स आघाडीवर
एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स हा चित्रपट या यादीत 11 नामांकनासह आघाडीवर आहे. द बॅन्शीज ऑफ इनशेरिन आणि ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट या दोन चित्रपटांना 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये 9 नामांकने मिळाली आहेत. त्यानंतर एल्विसला 8 नामांकने मिळाली आहेत. स्टीव्हन स्पीलबर्गच्या 'द फॅबेलमॅन्स'ला 7 नामांकने आहेत.. टॉड फील्डच्या टार आणि जोसेफ कोसिंस्कीच्या टॉप गन मॅव्हरिक या दोन चित्रपटांना 6 नामांकने मिळाली आहेत.
सर्वोत्तम चित्रपट
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
सर्वोत्कृष्ट अभिनेता
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
'नाटू नाटू'ची भूरळ कायम
एसएस राजामौली यांचा 'आरआरआर' हा चित्रपट 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 'अवतार' चित्रपटाचे निर्माते जेम्स कॅमरुन यांनाही हा चित्रपट आवडला होता. त्यांनी दोनदा हा चित्रपट पाहिला. चित्रपटातील 'नाटू-नाटू' या गाण्याचे शूटिंग युक्रेनमधील वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर करण्यात आले आहे. नाटू-नाटू या गाण्याला ओरिजन साँग्स या श्रेणीत नामांकन मिळाल्यानंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.