आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्कर पुरस्कारापूर्वी अमेरिकेत RRR चा जलवा:आज लॉस एंजिलिसमध्ये जगातील सर्वात मोठे स्क्रिनिंग, 1647 आसनी शो हाऊसफुल्ल

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्कर अवॉर्ड्स 2023 सोहळ्याच्या काही दिवस आधी RRR हा चित्रपट लॉस एंजिलिस आणि यूएसए मध्ये पुन्हा रिलीज केला जाणार आहे. येथील एका थिएटरमध्ये काही तासांतच या चित्रपटाची 1600 हून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. संपूर्ण थिएटर हाऊसफुल्ल झाले आहे.

याची अधिकृत घोषणा करताना चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले आहे की, 2 मार्च रोजी लॉस एंजिलिस जगातील सर्वात मोठ्या स्क्रीनिंगचे साक्षीदार होईल. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचा मुख्य अभिनेता रामचरण आणि दिग्दर्शक एसएस राजामौली देखील स्क्रिनिंगला उपस्थित राहणार आहेत.

1647 आसनी शो हाऊसफुल्ल
RRR चित्रपटाच्या सोशल मीडिया हँडलवर ट्वीट करण्यात आले की, 'उद्या लॉस एंजिलिस जगातील सर्वात मोठ्या स्क्रीनिंगचे साक्षीदार होईल. 1647 आसनी असलेला हा शो आधीच हाऊसफुल्ल आहे. एस.एस. राजामौली, एम कीरावानी आणि रामचरण तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतील.'

नाटू-नाटूवर थिरकणार संपूर्ण जग
ऑस्कर पुरस्कार 2023 सोहळ्यात RRR चित्रपटातील नाटू-नाटू हे गाणे लाइव्ह सादर केले जाणार आहे. गायक राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव हे गाणे लाइव्ह सादर करणार आहेत. 28 फेब्रुवारी रोजी अकादमीने ट्विटरवर यादसंदर्भात घोषणा करत ऑस्कर इव्हेंटमध्ये नाटू नाटू गाण्याचे लाइव्ह सादरीकरण केले जाईल, अशी माहिती दिली. “राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव ‘नाटू नाटू’ 95 व्या अकादमी पुरस्कारात लाइव्ह,” असे लिहिले होते. चित्रपटाच्या टीमसाठी ही आनंदाची बाब आहे.

13 मार्च रोजी रंगणार ऑस्कर पुरस्कार सोहळा
ऑस्कर पुरस्कार सोहळा 13 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 5:30 वाजता सुरू होईल. यावेळी ऑस्कर सोहळा भारतीयांसाठी खूप खास आहे. त्याचे कारण म्हणजे RRR या चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजिनिल साँग श्रेणीत नामांकन मिळाले आहे. या पुरस्कार सोहळ्याकडे आता भारतीयांच्या नजरा लागल्या आहेत.

काही काळापूर्वी, नाटू-नाटू या गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला होता. तर क्रिटिक्स चॉइस अवॉर्डमध्ये RRR ने सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट आणि नाटू-नाटूने सर्वोत्कृष्ट गाण्याचा किताब आपल्या नावी केला होता.

हॉलिवूड क्रिटिक्स अवॉर्डही जिंकला
हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशनने 24 फेब्रुवारी रोजी फिल्म अवॉर्ड्सचे आयोजन केले होते. या पुरस्कार सोहळ्यात आरआरआरने 4 पुरस्कार आपल्या नावी केले होते. सर्वोत्कृष्ट अॅक्शन फिल्म, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साँग आणि सर्वोत्कृष्ट स्टंट हे पुरस्कार जिंकले होते.

या चित्रपटाने जगभरात केला 1200 कोटींचा व्यवसाय
RRR ने जगभरात 1200 कोटींहून अधिकची कमाई केली. चित्रपटाच्या कमाईचा ओघ आजही सुरु आहे. जगातील अनेक भागांत अद्याप हा चित्रपट बघितला जातोय. जपान आणि यूएस मधील अनेक शहरांमध्ये चित्रपट पुन्हा रिलीज करण्यात आला. अमेरिकेत या चित्रपटाने 110.7 कोटी रुपयांहून अधिक कमाई नवीन विक्रम केला.

यूएईमध्येही या चित्रपटाने 40 कोटींचा व्यवसाय केला आहे. एस.एस राजामौली दिग्दर्शित या पॅन इंडिया चित्रपटात राम चरण, ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि श्रिया सरन मुख्य भूमिकेत होते. अजय देवगणनेही या चित्रपटात कॅमिओ केला होता. हा चित्रपट 25 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

बातम्या आणखी आहेत...