आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुबी मेयर्सची रंजक कहाणी:जेव्हा हीरोला 100 रुपये मानधन मिळायचे तेव्हा रुबी घ्यायची 5 हजार रुपये, रोल्स रॉयसमधून करायची प्रवास

लेखक: इफत कुरेशी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्या चित्रपटानंतर रुबी मेयर्स बनल्या सुलोचना

आज 3 मे... आज चित्रपटसृष्टीला 109 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच दिवशी पहिला भारतीय चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' प्रदर्शित झाला होता. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला मूकपटांची पहिली सुपरस्टार रुबी मेयर्सची कहाणी सांगत आहोत -

परदेशी वंशाच्या रुबी मेयर्स म्हणजेच सुलोचना यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला सुपरस्टारचा दर्जा मिळाला होता. त्यांच्या आधी काही महिला चित्रपटांत आल्या, पण रुबी आपल्या कौशल्याने भारताच्या पहिली महिला सुपरस्टार बनल्या. हा तो काळ होता जेव्हा भारतात फक्त मूकपट तयार होत असे.

चित्रपटात संवाद नव्हते, गाणी नव्हती, पण मोठ्या पडद्यावर रुबी यांना बघताच त्यांच्यावरच नजरा खिळून राहयच्या. त्यांची क्रेझ एवढी होती की जिथे मोठे कलाकार फक्त 100 रुपये घेत असत तिथे रुबी प्रत्येक चित्रपटासाठी 5 हजार रुपये घेत असे. त्यावेळी महाराष्ट्राच्या राज्यपालांचे वेतनही यापेक्षा खूपच कमी होते. 1925 मध्ये चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या सुलोचना यांनी 65 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत 107 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

ध्वनीचित्रपटांचे युग आले तेव्हा ब्रिटिश वंशाच्या रुबी यांना हिंदीत येत नसल्याने बाजूला करण्यात आले. पण एक वर्षाचा ब्रेक घेऊन रुबी यांनी हिंदीवर प्रभुत्व मिळवले आणि जोरदार कमबॅक केले. रुबी यांनी रुबी पिक ही स्वतःची प्रोडक्शन कंपनी सुरू केली आणि सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरल्या.

बघताच क्षणी त्यांच्यावर खिळून राहायची नजर
रुबी मेयर्स यांचा जन्म 1907 मध्ये पुणे, महाराष्ट्र येथे झाला. खर्च भागवण्यासाठी रुबी टेलिफोन ऑपरेटरची नोकरी करायच्या. टायपिंग स्पीडमध्ये त्यांचा हात कुणीही पकडू शकत नव्हते, तर सौंदर्य असे की नेहमीच आकर्षणाचे केंद्र होते. येथेच कोहिनूर फिल्म कंपनीचे मोहन भवनानी यांची नजर त्यांच्यावर पडली. मोहन यांनी त्यांना चित्रपटात काम करणार का? असे विचारताच, त्यांनी मात्र नकार दिला.

पहिल्या चित्रपटानंतर रुबी मेयर्स बनल्या सुलोचना
त्याकाळी अभिनय क्षेत्रात महिलांनी काम करणे सभ्य मानले जात नसे. रुबी यांच्या सौंदर्याची भूरळ पडलेल्या मोहन भवनानी यांनी हट्ट पकडला आणि अखेर रुबी यांनी चित्रपटात काम करण्यास होकार दिला. मात्र, त्यांना अभिनयाचा अनुभव नव्हता. मूकपटांचा हा काळ होता, त्यावेळी चित्रपटात संवाद किंवा आवाज नव्हता. रुबी यांनी 1925 मध्ये आलेल्या वीर बाला चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात त्यांना मिस रुबी याच नावाने क्रेडिट मिळाले, पण त्यानंतर रुबी सुलोचना बनल्या.

भवनानी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या चित्रपटांनी सुलोचना यांना स्टार बनवले, पण काही चित्रपटांनंतर सुलोचना कोहिनूर कंपनी सोडून इंपीरियल फिल्म कंपनीत रुजू झाल्या. सुलोचना यांनी या कंपनीसोबत जवळपास 37 चित्रपट केले.

यापैकी टाइपिस्ट गर्ल (1926), बलिदान (1927), वाइल्ड कॅट ऑफ बॉम्बे (1927) हे चित्रपट खूप गाजले. 1928-29 दरम्यान प्रदर्शित झालेल्या माधुरी, अनारकली आणि इंदिरा बीए या चित्रपटांनी सुलोचना यांना यशस्वी अभिनेत्रीचा दर्जा मिळवून दिला.

त्याकाळी अभिनेते सायकलवरून सेटवर जायचे, पण सुलोचना मात्र शेवरले आणि रोल्स रॉयससारख्या आलिशान गाड्यांमधून प्रवास करत होत्या. त्यागाडीतून उतरल्या की, आजूबाजूला बघ्यांची गर्दी असायची. लोकांमध्ये त्यांच्याबद्दल क्रेझ एवढी होती की, गर्दीच्या भीतीने सुलोचना स्वतःचा चित्रपट पाहण्यासाठी बुरखा घालून जायच्या.

सुलोचना या भारतीय महिलांसाठी प्रेरणा बनल्या
पडद्यामध्ये राहणा-या महिलांसाठी सुलोचना प्रेरणा बनल्या. स्विमिंग, घोडेस्वारी आणि चित्रपटांमध्ये स्टंटबाजी करण्यात त्या मागे राहिल्या नाही.

किसिंग सीनमुळे खळबळ उडाली
'हीर-रांझा' या चित्रपटात सुलोचना यांनी त्याचा सहकलाकार डी बिलिमोरियासोबत चुंबनदृश्य दिले तेव्हा प्रचंड गोंधळ झाला. सुलोचना लवकरच मूकपटांच्या सेक्स सिम्बॉल बनल्या. रिलशिवाय खऱ्या आयुष्यातही सुलोचना बोल्डनेसने लोकांचे लक्ष वेधून घेत असे.

बोलपटांचे युग आले तेव्हा त्या मात्र मागे पडल्या
रुबी यशस्वी अभिनेत्री बनल्या होत्या, पण जेव्हा पहिला बोलपट 'आलम-आरा' आला तेव्हा निर्मात्यांनी त्यांच्या जागी झुबेदाला कास्ट केले. कारण रुबी यांच्यापेक्षा झुबेदा यांचे हिंदी आणि उर्दूचे ज्ञान अधिक होते.

सुलोचना यांना हे सहन होत नव्हते. काळानुसार राहण्यासाठी तिने चित्रपटांमधून एक वर्षाचा ब्रेक घेतला आणि पुन्हा हिंदीचे धडे गिरवायला सुरुवात केली. दरम्यान, सुलोचना यांच्या सर्व मूकपटांचे ध्वनिमुद्रण करण्यात आले. वीरबाला चित्रपट माय मॅन या नावाने बनवला गेला.

तर माधुरी, अनारकली, इंदिरा बीए यांनी पुन्हा बॉक्स ऑफिसवर चांगली छाप सोडली. नूरजहाँ, खुर्शीद, सुरैया या नवीन अभिनेत्रींच्या आगमनाने सुलोचना यांची लोकप्रियता कमी झाली, पण त्यांचा स्वभाव आणि महागडे छंद कायम राहिले.

बोल्डनेसमुळे मोरारजी देसाईंनी घातली सुलोचना यांच्या चित्रपटावर बंदी
जुगनू या चित्रपटात विद्यार्थिनी झालेल्या सुलोचना आणि प्राध्यापक झालेल्या दिलीप कुमार यांच्यात लव्ह अँगल दाखवण्यात आला होता. त्यानंतर मुंबई राज्याचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी हा चित्रपट असभ्य आणि नैतिकतेच्या विरुद्ध असल्याचे सांगत त्यावर बंदी घातली. या चित्रपटात दिलीप कुमार आणि नूरजहाँ मुख्य भूमिकेत होते, तर सुलोचना या चित्रपटात विद्यार्थिनीच्या भूमिकेत होत्या.

लोकप्रियता कमी झाल्यानंतर एक्स्ट्रा म्हणून केले काम
सुलोचना यांचा अनारकली हा चित्रपट तिसऱ्यांदा बनला तेव्हा सुलोचना यांना मुख्य भूमिकेऐवजी सलीमची आई जोधाबाईचा साईड रोल मिळाला. बीना रॉय या चित्रपटाची नायिका होती. स्वतःचे महागडे छंद पूर्ण करण्यासाठी सुलोचना यांनी हे मान्य केले. साइड रोल मिळणे बंद झाल्यावर सुलोचना एक्स्ट्रा म्हणून काम करू लागल्या.

छंद मोठे पण कमाई नव्हती
एक वेळ अशी आली की सुलोचना यांना इंडस्ट्रीत काम मिळणे बंद झाले. सुलोचना यांच्या सोन्याच्या दागिन्यांची जागा बनावट दागिन्यांनी घेतली. आर्थिक संकटाचा काळ सुरू झाला, पण त्यांनी कधीच कुणासमोर हात पसरला नाही. सुलोचना पहिल्या महिला सुपरस्टारपासून ज्युनियर आर्टिस्ट बनल्या. सुलोचना यांच्याकडे काम नव्हते, पण इंडस्ट्रीने त्यांना खूप मान दिला.

1973 मध्ये, सुलोचना यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुलोचना लोकांच्या नजरेतून दूर जाऊ लागल्या. अखेर 10 ऑक्टोबर 1983 रोजी अज्ञातवासात जीवन जगणाऱ्या सुलोचना यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला.

बातम्या आणखी आहेत...