आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'साथ निभाना साथिया' फेम रुचा हसबनीस दुसऱ्यांदा आई झाली असून तिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. रुचाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. स्वतः रुचाने ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या फोटोमध्ये तिच्या मुलाचे पाय दिसत असून एका बोर्डवर 'तू जादू आहेस' असे लिहिले आहे. या फोटोत नवजात बाळाचा चेहरा दिसत नाहीये.
रुचावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव
हा फोटो शेअर करत रुचाने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘रुहीचा साथीदार इथे आहे आणि तो मुलगा आहे’. या पोस्टवर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यत सर्व जण कमेंट करत तिला शुभेच्छा देत आहेत. त्याचबरोबर चाहत्यांनी रुचाकडे तिच्या मुलाचा चेहरा दाखवावा, अशी इच्छादेखील व्यक्त केली आहे.
ऑगस्टमध्ये दिली होती प्रेग्नेंसीची माहिती
रुचाने तिच्या गरोदरपणाची बातमी ऑगस्टमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिने शेअर केलेल्या फोटोत तिची 3 वर्षांची मुलगी एका बोर्डवर बिग सिस्टर लिहिताना दिसतेय. अभिनेत्रीने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'एक अजून प्रेम करण्यासाठी.'
रुचा लग्नानंतर लाइमलाइटपासून दूर आहे
रुचाबद्दल बोलायचे झाले तर तिने 2009 मध्ये मराठी टीव्ही अभिनेत्री म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. 2015 मध्ये तिने राहुल जगदाळेसोबत लग्न केले. लग्न झाल्यापासून ती छोट्या पडद्यापासून दूर आहे. राशीच्या भूमिकेतून रुचाला खूप प्रसिद्धी मिळाली. 2020 मध्ये 'साथ निभाना साथिया'च्या एका सीनमुळे ती खूप चर्चेत आली होती. लग्नापासून रुचा लाइमलाइटपासून दूर आहे आणि आपल्या कुटुंब आणि व्यवसायात व्यस्त आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.