आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधनाच्या वृत्ताचे स्वतः केले खंडन:मिनाक्षी शेषाद्रीच्या निधनाची पसरली होती अफवा, चर्चांना उधाण आल्यानंतर शेअर केला स्वतःचा फोटो

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिनाक्षी शेषाद्री अभिनयापासून दूर आता नृत्यात रमतात.

90 च्या दशकात आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भूरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे मिनाक्षी शेषाद्री. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी मिस इंडियाचा किताब आपल्या नावी करणा-या या अभिनेत्रीने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये यशोशिखर गाठले. मात्र अचानक मिनाक्षी यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आणि लग्न करुन परदेशी स्थायिक झाल्या. पण गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र आता स्वत: मिनाक्षी यांनी फोटो शेअर करत या सर्व अफवा असल्याचे सांगितले आहे.

मिनाक्षी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या गार्डनमध्ये बसल्याचे दिसत आहे. दरम्यान त्यांनी लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘डान्स पोज’ असे कॅप्शन दिले आहे.

इन्व्हेस्टमेंट बँकरसोबत केले लग्न

मिनाक्षी यांनी 1995 साली इन्व्हेस्टमेंट बँकर हरीश मैसूरसोबत लग्न केले आणि अमेरिकेतील प्लानो (टेक्सास) मध्ये स्थायिक झाल्या. दोघांनी न्यूयॉर्कमध्ये रजिस्टर्ड मॅरेज केले होते. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचे नाव केंद्रा तर मुलाचे नाव जोश आहे. लग्नानंतर मिनाक्षी सिनेसृष्टीपासून कायमच्या दुरावली. चित्रपटसृष्टीपासून दुरावल्यानंतर मिनाक्षी यांनी आपली नृत्याची आवड जोपासली. टेक्सासमध्ये त्यांनी Cherish Dance School नावाने डान्स अकॅडमी सुरु केली आहे. टेक्सासमधील भारतीयांमध्ये मिनाक्षी लोकप्रिय आहेत.

'घातक' होता शेवटचा चित्रपट
आपल्या फिल्मी करिअरमध्ये मिनाक्षी यांनी ‘मेरी जंग’, ‘घर हो तो ऐसा’, ‘घायल’, ‘दामिनी’ आणि ‘घातक’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. 1996 साली रिलीज झालेल्या 'घातक' या चित्रपटात त्या शेवटची झळकल्या होत्या. त्यानंतर त्या पेज थ्री पार्टीजमध्येही कधी दिसल्या नाहीत.

अभिनेत्रीसोबत मिनाक्षी एक उत्कृष्ट क्लासिकल डान्सरसुद्धा आहेत.चार नृत्यप्रकारात त्या पारंगत आहेत. भरतनाट्यम, कुचिपुडी, कथ्थक आणि ओडिसी नृत्य प्रकार त्या शिकल्या आहेत. त्यांनी वेम्पति चिन्ना सत्यम आणि जय रामाराव यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवले होते. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी अनेक मोठ्या दिग्दर्शक-निर्मात्यांसोबत काम केले आहे. अमिताभ बच्चनपासून ते विनोद खन्ना, ऋषी कपूर, अनिल कपूर हे मोठे फिल्म स्टार्स त्यांचे हीरो होते.

बातम्या आणखी आहेत...