आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीची आत्महत्या:'कंचना 3'मध्ये झळकलेली अभिनेत्री अ‍ॅलेक्झेंडर डिजवी गोव्यातील घरात आढळली मृतावस्थेत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअपमुळे निराश झाली होती अभिनेत्री

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार राघव लॉरेन्सच्या ‘कंचना 3’ या सुपरहिट चित्रपटात झळकलेली अभिनेत्री अ‍ॅलेक्झेंडर डिजवीचे निधन झाले आहे. ती 24 व्या वर्षांची होती. गोव्यातील राहत्या घरी ती मृतावस्थेत आढळली. येथे ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहात होती. घरातील किचनमध्ये अ‍ॅलेक्झेंडरचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी तिच्याजवळ सुसाइड नोट आढळलेली नाही. अ‍ॅलेक्झेंडरने आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे

बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअपमुळे निराश झाली होती अभिनेत्री
20 ऑगस्ट रोजी अ‍ॅलेक्झेंडरचे निधन झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पण तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅलेक्झेंडरचा बॉयफ्रेंड तिला सोडून गेल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती नैराश्यात होती, अशी माहिती अ‍ॅलेक्झेंडरच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे नैराश्यामध्ये अ‍ॅलेक्झेंडरने आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे.

यापूर्वी अ‍ॅलेक्झेंडरने 2019 मध्ये चेन्नईतील एका फोटोग्राफरविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर फोटोग्राफरला अटक झाली होती. ग्रेटर चेन्नईच्या पोलिसांनी म्हटले की, ते 2019 मधील या प्रकरणाशी संबंधित माहिती गोवा पोलिसांना देतील.

'कंचना 3' हा चित्रपट राघव लॉरेन्स यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटात राघव लॉरेन्स यांच्यासह ओविया, वेधिका, निक्की तांबोली आणि अ‍ॅलेक्झेंडर डिजवी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

बातम्या आणखी आहेत...