आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालासुब्रमण्यम अनंतात विलीन:चेन्नईत शासकीय इतमामात दिला गेला अखेरचा निरोप, अंत्यसंस्कार करण्यापूर्वी फार्महाऊसवर नेण्यात आले होते पार्थिव

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
एसपी बालासुब्रमण्यम यांच्या पश्च्यात पत्नी सावित्री, मुलगी पल्लवी आणि मुलगा पी. चरण आहेत. पी. चरण एक गायक आणि चित्रपटाचे निर्माता आहेत. - Divya Marathi
एसपी बालासुब्रमण्यम यांच्या पश्च्यात पत्नी सावित्री, मुलगी पल्लवी आणि मुलगा पी. चरण आहेत. पी. चरण एक गायक आणि चित्रपटाचे निर्माता आहेत.
  • 74 वर्षीय एसपी बालासुब्रमण्यम यांचे शुक्रवारी दुपारी चेन्नईत निधन झाले.
  • 5 ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाचे संक्रमण झाले होते, तेव्हापासून चेन्नईतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

ज्येष्ठ गायक एस.पी. बालासुब्रमण्यम अनंतात विलीन झाले आहेत. शनिवारी दुपारी चेन्नई येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप दिला गेला. शुक्रवारी एसपी यांचे चेन्नई येथील एका खासगी रूग्णालयात निधन झाले होते. ते 74 वर्षांचे होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि जवळजवळ 52 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.

अंत्यसंस्कारापूर्वी पार्थिव त्यांच्या फार्महाऊसमध्ये नेण्यात आले होते

शुक्रवारी संध्याकाळी एसपी यांचे पार्थिव तिरुवल्लूर जिल्ह्यातील थमराइपक्कम येथील त्यांच्या रेड हिल्स फार्महाऊसमध्ये नेण्यात आले होते. यावेळी चाहत्यांनी त्यांचे पार्थिव शरीर घेऊन जाणा-या व्हॅनचा पाठलाग केला होता. चाहत्यांना एसपी यांचे अखेरचे दर्शन घेता यावे यासाठी व्हॅन स्लो करावी लागली होती.

दिग्दर्शक भारतीराजा अंत्यसंस्कारात सामील झाले

ज्येष्ठ दिग्दर्शक भरतीराजा यांनी एसपींच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली. याआधी शुक्रवारी संध्याकाळी ते रुग्णालयातदेखील हजर होते. गायक मानो हे देखील एसपींना अखेरचा निरोप द्यायला पोहोचले होते.

करिअरमध्ये 40 हजारांहून अधिक गाणी गायली

एसपींनी आपल्या 50 वर्षांच्या सिंगिंग करिअरमध्ये तेलुगु, तामिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम भाषेत 40,000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. एसपींनी कन्नड संगीतकार उपेंद्र कुमार यांच्यासाठी 12 तासांत 21 गाणी स्वरबद्ध केली होती. यासाठी त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली होती. एकेकाळी एसपी एका दिवसांत वेगवेगळ्या भाषेतील 16-17 गाणी एकाच दिवसात रेकॉर्ड करायचे. बर्‍याच वेळा ते 17 तास सतत गाणी गायचे.

बॉलिवूडमध्ये सलमानचा आवाज बनले

एसपींना बॉलिवूडमध्ये सलमान खानचा आवाज म्हणून ओळखला जात असे. जवळपास दशकभर त्यांनी सलमानची एकापेक्षा जास्त गाणी गायली. 'मैंने प्यार किया' मधील 'दिल दीवाना' गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला होता.

त्याचबरोबर 'हम आपके हैं कौन' या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्याबरोबर त्यांनी गायलेले 'दीदी तेरा दीवाना दिवाना' हे गाणे आजही प्रेक्षकांच्या ओठी आहे. एकेकाळी किशोर कुमार हे राजेश खन्ना यांचा आवाज मानले जायचे. त्याचप्रमाणे बाला यांनी सलमानचा आवाज बनून बॉलिवूडमध्ये नाम कमावले.

बातम्या आणखी आहेत...