आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'साथ निभाना साथिया'च्या 'राशी बहु'ने दिली गु़ड न्यूज:दुस-यांदा आई होणारेय रुचा हसबनीस, 3 वर्षांपूर्वी दिला होता मुलीला जन्म

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'साथ निभाना साथिया' फेम रुचा हसबनीस पुन्हा एकदा आई होणार आहे. ही गोड बातमी रुचाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या फोटोत तिची 3 वर्षांची मुलगी एका बोर्डवर बिग सिस्टर लिहिताना दिसत आहे. अभिनेत्रीने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'एक अजून प्रेम करण्यासाठी.'

रुचाने मुलीचा फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे.
रुचाने मुलीचा फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे.

सेलिब्रिटींनी केला रुचावर शुभेच्छांचा वर्षाव
चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण रुचावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या पोस्टवर 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील रुचाची सह-कलाकार देवोलिना भट्टाचार्जीने हिने हार्ट इमोजी शेअर करून आनंद व्यक्त केला. याशिवाय अभिनेत्री अदा खान आणि काजल पिसल यांनीही रुचाचे अभिनंदन केले आहे.

रुचा लग्नानंतर लाइमलाइटपासून दूर आहे

रुचाबद्दल बोलायचे झाले तर तिने 2009 मध्ये मराठी टीव्ही अभिनेत्री म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. 2015 मध्ये तिने राहुल जगदाळेसोबत लग्न केले. लग्न झाल्यापासून ती छोट्या पडद्यापासून दूर आहे. राशीच्या भूमिकेतून रुचाला खूप प्रसिद्धी मिळाली. 2020 मध्ये 'साथ निभाना साथिया'च्या एका सीनमुळे ती खूप चर्चेत आली होती. लग्नापासून रुचा लाइमलाइटपासून दूर आहे आणि आपल्या कुटुंब आणि व्यवसायात व्यस्त आहे.

बातम्या आणखी आहेत...