आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्माते सावन कुमार काळाच्या पडद्याआड:वयाच्या 86 वर्षी घेतला अखेरचा श्वास, संजीव कुमार ते सलमान खान यांना बनवले होते स्टार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि गीतकार सावन कुमार टाक यांनी आज (25 ऑगस्ट) अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डात हलवण्यात होते. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेता सलमान खानने ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

किडनीशी संबंधित आजाराने होते त्रस्त

सावन कुमार यांच्या पुतण्याने अलीकडेच ई-टाइम्सशी बोलताना सांगितले होते की, 'काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना किडनीशी संबंधित आजार होता, पण यावेळी ते गंभीर होते आणि त्यांचे हृदय नीट काम करत नव्हते.

संजीव कपूर यांना बनवले होते स्टार

जयपूर, राजस्थान येथे जन्मलेल्या सावन कुमार टाक यांना चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन करण्याव्यतिरिक्त कविता आणि गाणी लिहिण्याची खूप आवड होती. केवळ स्वतःच्याच चित्रपटांसाठी नाही तर, त्यांनी इतर चित्रपट निर्मात्यांच्या अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहिली. त्यापैकी अनेक सुपरहिट ठरली.

संजीव कुमार आणि महमूद ज्युनियर यांना स्टार बनवण्याचे श्रेय सावन कुमार यांना दिले जाते. 1967 मध्ये आलेल्या 'नौनिहाल' या चित्रपटातून त्यांनी निर्माता म्हणून करिअरची सुरुवात केली होती, ज्यामध्ये संजीव कपूर मुख्य भूमिकेत होते. त्यांच्या पहिल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

सावन कुमार यांच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट 'गोमती के किनारे' हा होता, हा चित्रपट मीना कुमारी यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट होता. पुढे त्यांनी सौतन, सौतन की बेटी, सनम बेवफा, बेवफा से वफा अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. निर्माता आणि दिग्दर्शक असण्यासोबतच ते उत्कृष्ट गीतकारही आहेत. 'जिंदगी प्यार का गीत है..' हे प्रसिद्ध गाणे त्यांनीच लिहिले आहे. याशिवाय कहो ना प्यार है आणि देव या चित्रपटातील गाणीही त्यांच्या लेखणीतून साकारली.

सावन कुमार टाक यांची प्रकृती चिंताजनक:86 वर्षीय चित्रपट निर्माते आयसीयूमध्ये दाखल, पुतण्या म्हणाला- 'ते गंभीर आहेत, प्रार्थनांची गरज आहे'

बातम्या आणखी आहेत...