आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह बर्ड्स::सबा आझादने हृतिक रोशनच्या कुटुंबासोबत घेतला जेवणाचा आनंद, काका राजेश रोशन यांनी शेअर केला 'हा' खास फोटो

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजेश रोशन यांच्या या पोस्टवर सबा आणि हृतिक या दोघांनीही कमेंट केली आहे.

अभिनेत्री आणि गायिका सबा आझाद अभिनेता हृतिक रोशनला डेट करत असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. इतकेच नाही तर त्याच्या कुटुंबाशी देखील तिची जवळीक वाढत आहे. विशेष म्हणजे सबाने रविवारी हृतिकच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत जेवणाचा आनंद घेतला. या फॅमिली गेट टू गेदरचा फोटो हृतिकचे काका राजेश रोशन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

राजेश यांनी शेअर केली पोस्ट
राजेश यांनी त्यांचा फॅमिली फोटो शेअर केला आहे, ज्यात सबा आणि हृतिकही दिसत आहेत. राजेश यांंनी आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'आनंद नेहमीच तुमच्या आसपास असतो. विशेषत: रविवारी…. दुपारच्या जेवणाच्या वेळी.'

सबा आणि हृतिकने कमेंट केली
काका राजेश यांच्या पोस्टवर कमेंट करताना हृतिकने लिहिले की, 'बरोबर काका, खूप मज्जा आली.' हृतिकनंतर सबानेही या पोस्टवर कमेंट केली आहे. तिने लिहिले, 'बेस्ट संडे...'

कोण आहे सबा आझाद?

सबा आझाद ही एक बॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका आहे. 2008 मध्ये आलेल्या ‘दिल कबड्डी’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 2011 मध्ये आलेल्या ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ या चित्रपटात झळकली होती. सबाला गायनासोबतच थिएटरचीही प्रचंड आवड आहे. तिने अभिनेता नसरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाह याच्यासोबत ‘मॅडबॉय/मिंक’ या इलेक्ट्रॉनिक बँडचीही सुरुवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...