आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिक रोशनने गर्लफ्रेंडचा वाढदिवस बनवला स्पेशल:सबा आझादने व्हिडिओ शेअर करत म्हटले थँक्यू, सुझानने दिल्या शुभेच्छा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादने 1 नोव्हेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा केला, ज्याचा एक मोंटाज व्हिडिओ सबाने तिच्या इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हृतिक रोशन सबाचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सबा आणि हृतिक नृत्याचा सराव करताना, पिकनिक एन्जॉय करताना, जिममध्ये व्यायाम करताना आणि केक कापताना दिसत आहेत. यादरम्यान दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना सबाने हृतिकचे आभारही मानले आहेत. सबाच्या या पोस्टवर हृतिकची पुर्वाश्रमीची पत्नी सुझाननेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुझानने लिहिले, 'खूप सुंदर सबू, तुम्हा दोघांवर देवाचे आशीर्वाद कायम राहो.' या दोघांच्या या व्हिडिओवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...