आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू साँग रिलीज:बॉयकॉटची मागणी सुरु असताना रिलीज झाले 'सडक 2'चे दुसरे गाणे 'इश्क कमल', प्रदर्शित होताच मिळाले 27 हजार डिसलाइक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 28 ऑगस्ट रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर 'सडक 2' रिलीज होणार आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाही आणि गटबाजीवरुन वादंग उठले आहे. याचा मोठा फटका स्टारकिड्सच्या चित्रपटाला बसताना दिसतोय. स्टारकिड्सचे चित्रपट बॉयकॉट केले जात आहेत. जान्हवी कपूरच्या 'गुंजन सक्सेना'नंतर आलिया भट्टच्या 'सडक 2' या चित्रपटाला प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. येत्या 28 ऑगस्टला रिलीज होत असलेला हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान या चित्रपटातील 'इश्क कमल' हे दुसरे रोमँटिक गाणे रिलीज करण्यात आले आहे. ट्रेलर आणि पहिले गाणे 'तुम से ही' नंतर या गाण्याला देखील लाइकपेक्षा लोकांचे डिसलाइक जास्त मिळाले आहेत.

आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांच्या प्रवासावर 'इश्क कमल' हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल सुनील जीत आणि शालू वैश यांनी मिळून लिहिले आहेत. जावेद अलीने या गाण्याला आपला सुंदर आवाज दिला आहे, तर त्याला सुनील जीत यांनी संगीत दिले आहे. गाण्यात आलिया आणि आदित्य यांची रोमँटिक बाँडिंग पाहायला मिळत आहे. तर, संजय त्याच्या भूतकाळ आठवताना दिसतोय. संजय दत्त,

  • काही तासांतच मिळाले 27 हजार डिसलाइक

यापूर्वी रिलीज झालेल्या गाण्याला लाइक्सपेक्षा तीन पट जास्त डिसलाइक्स मिळाले होते. तर इश्क कमाल या गाण्याला अवघ्या काही तासांत 27 हजार डिसलाइक मिळाले आहेत. याव्यतिरिक्त, चित्रपटाचा ट्रेलर 10 मिलियन डिसलाइकसह जगातील तिसरा सर्वाधिक नापसंत व्हिडिओ बनला आहे.

28 ऑगस्ट रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर 'सडक 2' रिलीज होणार आहे. महेश भट्ट दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्ट, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर, गुलशन ग्रोव्हर, मकरंद देशपांडे मुख्य भूमिकेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...