आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सडक 2'कडे रिलीजपूर्वीच प्रेक्षकांची पाठ:जगातील टॉप 3 डिसलाइक्स व्हिडिओत सामिल झाला 'सडक 2'चा ट्रेलर, एक कोटींहून अधिक मिळाले आहेत थंब डाऊन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'सडक 2' च्या या अवस्थेला स्वतः भट्ट कुटुंबीय जबाबदार आहे.

'सडक 2' या चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट आहेत. आलिया भट्ट आणि संजय दत्त यांसारखे नावाजलेले कलाकार या चित्रपटात आहेत. मात्र संजय आणि पूजा भट्ट स्टारर 90 च्या दशकातील 'सडक' या सुपरहिट चित्रपटाचा दुसरा पार्ट कदाचितच लोकांना आवडेल अशी चिन्ह दिसत आहे. कारण चित्रपटाचा ट्रेलर जगातील सर्वाधिक नापसंत व्हिडिओंच्या यादीत टॉप 3 मध्ये पोहोचला आहे.

  • हे आहेत टॉप 3 सर्वाधिक नापसंत व्हिडिओ

सडक 2 च्या ट्रेलरला आतापर्यंत एक कोटींहून अधिक लोकांनी नापंसती दर्शवली आहे. यापूर्वी दुस-या क्रमांकावर गायक जस्टिन बीबरचा बेबी सॉंग व्हिडिओ होता. त्याला 11.6 मिलियन म्हणजे एक कोटी 10 लाख लोकांनी डिसलाइक केले होते. तर सध्या जगातील सर्वाधिक नापसंत व्हिडिओ म्हणजे YouTube चा 2018 चा रिवाइंड व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ युट्यूबने स्वतः पोस्ट केला आहे. याला आतापर्यंत 18.2 मिलियन म्हणजे 1 कोटी 80 लाख लोकांनी डिसलाइक केला आहे.

जगभरातील टॉप 5 डिसलाइक व्हिडिओ

यू ट्यूब रिवाइंड 2018डिसलाइक्स - 1 कोटी 82 लाख
जस्टिन बीबर बेबी साँगडिसलाइक्स - 1 कोटी 16 लाख
सडक 2 ट्रेलरडिसलाइक्स - 1 कोटी 12 लाख
यू ट्यूब रिवाइंड 2019डिसलाइक्स - 91 लाख
बेबी शार्क डान्सडिसलाइक्स - 89 लाख
लर्न द कलर्स (रशियन व्हिडिओ)डिसलाइक्स - 69 लाख
  • 5 दिवसांपूर्वी रिलीज झाला होता ट्रेलर

ट्रेलरच्या रिलिजच्या अवघ्या 5 दिवसांत ट्रेलरने हा विक्रम केला आहे. स्टार किड्स आणि नेपोटिज्मवरुन सुरु असलेल्या वादाचा फटका या चित्रपटाला बसला आहे. लवकरच, सडक 2 चा ट्रेलर डिसलाइकच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो. भारतात यू ट्यूबवर सर्वाधिक नापसंत झालेल्या व्हिडिओजमध्ये सडक 2 चा ट्रेलर पहिल्या क्रमांकावर आहे.

भारतातील सर्वाधिक नापसंत टॉप 5 व्हिडिओ

सडक 2 ट्रेलरडिसलाइक्स - 1 कोटी 12 लाख
एक्सप्लोरिंग शिलॉन्ग बाय मिस्टर फैजूडिसलाइक्स -36 लाख
कॉमेडियन कुणाल कामराचा कॅरी मिनाटीला रिप्लायडिसलाइक्स - 24 लाख
आमिर सिद्दीकीचा कॅरी मिनाटीला रिप्लायडिसलाइक्स 10 लाख
ओरू अदार लव फ्रिक पेनी रॅप साँगडिसलाइक्स - 9 लाख
सिंबा चित्रपटातील आँख मारे साँगडिसलाइक्स - 7 लाख
  • प्रेक्षकांच्या रोषाला का सामोरे जातोय 'सडक' 2 ट्रेलर

12 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या 'सडक 2' च्या ट्रेलरची ही अवस्था बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या घराणेशाहीच्या वादामुळे झाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाही आणि गटबाजीवरुन वादंग पेटेल आहे. त्यामुळे लोकांनी सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंड करुन आणि डिसलाइक करुन आपला रोष व्यक्त केला आहे. सडक 2 च्या या अवस्थेला स्वतः भट्ट कुटुंबीय जबाबदार आहे.

  • आलियाचा कॉफी विथ करणचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती म्हणते की मी सुशांतला मारू इच्छिते.
  • महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती यांचे कनेक्शन, व्हायरल फोटो आणि रियाचे रहस्य समोर आले.
  • कंगनाने भट्ट यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. तर पूजा भट्ट तिला प्रत्युतर देत आहे.
  • सुहृताच्या व्हायरल फेसबुक पोस्टनुसार, महेश भट्ट यांनी रियाला सुशांतपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.
बातम्या आणखी आहेत...