आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर अलीकडेच फहाद अहमदशी विवाहबद्ध झाली. दोघांनी जानेवारी महिन्यात कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर 16 मार्च रोजी दिल्लीत दोघांचे वेडिंग रिसेप्शन झाले. तत्पूर्वी दोघांनी कव्वाली नाईटचे आयोजन केले होते. खरं तर फवाद अहमदशी लग्न केल्यापासून स्वराला सातत्याने ट्रोल केले जात आहे. अशातच आता विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा स्वरावर निशाणा साधला आहे.
स्वराने पती फहाद अहमदबरोबरचे कव्वाली नाईटचे काही फोटो सोशल मीडियावर ट्वीट केले होते. या फोटोमध्ये स्वरा आणि फहादने गडद हिरव्या रंगाचे ट्रेडिशनल कपड्यांत दिसत आहेत. स्वराने हा फोटो शेअर करत ‘हॅलो शौहर’ असे कॅप्शन दिले होते.
स्वराचे हेच ट्वीट रिट्वीट करत साध्वी प्राची यांनी ‘काही अंदाज? फ्रीज की सुटकेस’ असे ट्वीट केले. पण या ट्वीटवरुन नेटकऱ्यांनी साध्वी प्राची यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने लिहिले, 'तुमच्या अशा विचारसरणीची चिड येते.' तर आणखी एकाने संताप व्यक्त करत लिहिले, 'तुमचे दुकान अशा ट्रोलिंगमुळेच सुरू आहे’, तर आणखी एकाने लिहिले, 'तुम्ही पण काय विचारताय? द्वेष पसरवून तुम्ही इतकं तर नक्कीच कमावलं असेल की नविवाहित जोडप्याला सूटकेस आणि फ्रीज दोन्हीही गिफ्ट करू शकाल'.
याआधीही स्वरावर साधला होता निशाणा
याआधाही साध्वी प्राची यांनी लग्नावरुन स्वरावर निशाणा साधला होता. कदाचित स्वराने श्रद्धा वालकरचे 35 तुकडे पाहिले नाहीत असे म्हटले आहे. स्वराच्या लग्नावर प्रतिक्रिया देत त्या म्हणाल्या होत्या, 'स्वरा याआधीही हिंदुविरोधी वक्तव्य करत होती. आता तिने फहाद अहमदशी लग्न केले. तिची ही कृती हिंदुविरोधी असल्याचे सिद्ध झाले आहे. कदाचित तिला फ्रीज आणि सुटकेसमध्ये ठेवलेले श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे दिसले नसावेत. जर स्वराने श्रद्धाचे तुकडे पाहिले असते तर कदाचित फहादशी लग्न केले नसते. श्रद्धा प्रमाणे स्वराचेही 35 तुकडे सापडू शकतात. लवकरच सोशल मीडियावर स्वरा आणि फहादच्या घटस्फोटाची बातमी येईल,' असे त्या म्हणाल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.