आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराVJ आणि मॉडेल अनुषा दांडेकरने अलीकडेच सोशल मीडियावर एका चिमुकलीसोबतचे फोटो शेअर करत ती आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. अनुष्काने मुलीचे नाव सहारा ठेवले आहे. अनुषाच्या पोस्टनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पण सहारा ही तिची मुलगी नसून तिने तिला दत्तक घेतल्याचा खुलासा आता स्वतः अनुषाने केला आहे. खरं तर लग्नाविनाच अनुष्का आई झाल्याने तिचे चाहतेसुद्धा गोंधळात पडले होते.
अनुषाने दत्तक मुलीबद्दल सोशल मीडियावर होत असलेली चर्चा पाहून स्वतः याबद्दल खुलासा दिला. इन्स्टा स्टेटसमध्ये तिने याबद्दल एक पोस्ट लिहून सहाराबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे.
मी तिची गॉडमदर...
अनुषाने सहाराची खरी आई झोया आणि आजी संगीता यांचा फोटो शेअर केला आहे. अनुषाने लिहिले की, "सहारा माझी मुलगी नसून तिची खरी आई झोहा आहे. मी तिची गॉड मदर आहे. याचा अर्थ तिला आणि तिच्या आईला जेव्हा आणि जशी माझी गरज वाटेल तेव्हा मी त्यांच्यासोबत असेन. अशारितीने ती माझी मुलगीच आहे पण खरी मुलगी नाही. मी तिची गॉड मदर आहे," असा खुलासा अनुषाने केला आहे.
यापूर्वी अनुषाने पोस्टमध्ये काय लिहिले होते?
यापूर्वी अनुषाने सहारासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. यात ती सहारासोबत खेळताना दिसतेय. चिमुकलीसोबतचे फोटो शेअर करत अनुषाने लिहिले, "अखेर माझ्याजवळ माझी छोटी परी आली आहे. ती माझी आहे.. मी तुम्हा सर्वांना माझ्या आयुष्यातील प्रेम असलेली माझी एंजल 'सहारा'ची ओळख करून देत आहे. ती माझ्या आयुष्याचे प्रेम आहे. मी तुझी खूप काळजी घेईल, तुझे सर्व संकटांपासून नेहमी रक्षण करेल. माझ्या बाळा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.. तुझीच आई," अशा शब्दांत अनुषाने तिच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण अनुषावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अनुषाच्या पोस्टवर एका चाहत्याने लिहिले, 'हे ऐकून खूप आनंद झाला.' आणखी एक चाहता म्हणाला, 'खूप क्यूट. तुझ्या छोट्या राजकुमारीला प्रेम आणि आशीर्वाद.'
करण कुंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती अनुषा
अनुषाबद्दल बोलायचे झाले तर ती तिच्या लव्ह लाईफ आणि करण कुंद्रासोबतच्या ब्रेकअपमुळे देखील चर्चेत आहे. गेल्यावर्षी दोघांनी ब्रेकअपची घोषणा केली होती. अनुषाच्या सोशल मीडिया पोस्टवरूनदेखील दोघे विभक्त झाल्याचे संकेत मिळाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.