आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माफीनामा:काश्मिरी पंडितांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर साई पल्लवी म्हणाली- 'काहीही बोलण्याआधी आता दोन वेळा विचार करेन'

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वतःची ओळख जात आणि धर्मावरुन विभागली नाही

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी काश्मिरी पंडितांवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. साई पल्लवीने 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटात दाखवलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या दृश्याची मॉब लिंचिंगशी तुलना केल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते. या संपूर्ण प्रकरणानंतर आता साई पल्लवीने तिच्या या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. काहीही बोलण्याआधी आता दोन वेळा विचार करेन, तसेच माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले, असे साई पल्लवीने म्हटले आहे.

मी केलेले विधान चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले
साई पल्लवीने इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत या विषयावर भाष्य केले आहे. व्हिडिओ शेअर करत ती म्हणतेय, "मी अशा माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतेय हे पहिल्यांदा घडत आहे. मी कायमच माझ्या मनात जे असेल ते बोलत असते. मी स्पष्टीकरण देण्यास किंवा माझी बाजू मांडण्यास थोडा उशीर केला आहे, याची मला जाणीव आहे. पण मला माफ करा. कारण मी केलेले विधान खूप चुकीच्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडण्यात आले आहे. मला फक्त इतकंच सांगायचे आहे की, धर्माच्या नावाने कोणताही वाद करणे चुकीचे आहे."

स्वतःची ओळख जात आणि धर्मावरुन विभागली नाही
साई पल्लवी पुढे म्हणाली, "मला 14 वर्षांपूर्वी शाळेचे काही दिवस आठवतात. त्यावेळी आम्ही दररोज शाळेत जायचो आणि प्रतिज्ञा म्हणायचो. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. ते मला अजूनही आवडते. मला त्याचा अभिमान वाटतो. लहान असताना कधीही जात, धर्म आणि अस्मिता यावरुन विभागण्यात आले नाही. त्यामुळे मी जेव्हा काही बोलतो तेव्हा त्याचा अगदी तटस्थपणे विचार करतो. पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मी तटस्थ विचार करणारी व्यक्ती आहे. पण माझ्या वक्तव्यानंतर बाहेर जे काही घडले ते पाहून मला स्वत:ला मोठा धक्का बसला. या सर्व प्रकारामुळे मला खूप दुःख झाले आहे. त्यापुढे इथून पुढे मी काहीही बोलण्याआधी दोन वेळा विचार करेन”, असे साई पल्लवीने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.

डावे की उजवे कुणाला पाठिंबा देते पल्लवी?

पल्लवी त्या मुलाखतीचा उल्लेख करताना सांगितले, "मला तू डावे आणि उजवे यातील कोणाला पाठिंबा देते, असे विचारण्यात आले होते. त्यावर मी म्हटले होते की, मी तटस्थ आहे. या सर्वांच्या आधी आपल्याला एक चांगला माणूस व्हायला हवे आणि अशाप्रकारे छळ झालेल्या व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत संरक्षण देण्याची आवश्यक आहे."

कशावरुन सुरु झाला वाद?
ग्रेट आंध्र न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत साई म्हणाली होती, ''माझ्या मते हिंसा हा संवादाचा चुकीचा मार्ग आहे. माझे कुटुंब हे एक तटस्थ भूमिका घेणारे कुटुंब आहे. त्यांनी मला फक्त चांगला माणूस बनण्यास शिकवले आहे. 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटामध्ये काश्मिरी पंडितांचा हत्याकांड, त्यांचा नरसंहार दाखवला गेला आहे. तर हिंसा आणि धर्माचे मापदंड केले गेले, तर काही दिवसांपूर्वी एका गायीने भरलेला ट्र्क घेऊन जाणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला मारहाण करत त्याला जय श्री राम म्हणण्यास सांगण्यात आले. ही सुद्धा धर्माच्या नावावर झालेली हत्या आहे. काश्मीरमध्ये जे घडले त्यात आणि मॉब लिचिंगच्या घटनांमध्ये काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत,' असे साई म्हणाली होती. साईच्या आगामी 'विराट पर्वम' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान साईने हे वक्तव्य केले होते.

नक्षलवादी चळवळीवर आधारित आहे आगामी चित्रपट

साईचा आगामी चित्रपट 'विराट पर्वम'मध्ये राणा दग्गुबती मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 1990 च्या सत्य घटनेवर आधारित आहे. त्याची पार्श्वभूमी तेलंगणा भागातील नक्षलवादी चळवळ आणि एक प्रेमकथा आहे. या चित्रपटात साई वेनेलाची भूमिका साकारत आहे, जी रवन्ना या नक्षलवादी नेत्याच्या प्रेमात पडते.

बातम्या आणखी आहेत...