आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साई पल्लवीच्या वक्तव्यावरुन वादंग:काश्मिरी पंडितांचा नरसंहार आणि मॉब लिंचिंग यात काही फरक नाही, साई पल्लवीचे खळबळजनक वक्तव्य

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नक्षलवादी चळवळीवर आधारित आहे आगामी चित्रपट

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या तिचा आगामी चित्रपट 'विराट पर्वम'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान अभिनेत्रीने एका मुलाखतीत काश्मिरी पंडित आणि मॉब लिंचिंगबाबत वक्तव्य केले होते, त्यावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. साईने द काश्मीर फाइल्स या चित्रपटात दाखवलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या दृश्यांची तुलना मॉब लिचिंगशी केली. तिच्या या वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावरील वातावरण चांगलेच तापले आहे.

काश्मिरी पंडितांचा नरसंहार आणि मॉब लिंचिंग यात फरक नाही: साई

ग्रेट आंध्र न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत साई म्हणाली, ''माझ्या मते हिंसा हा संवादाचा चुकीचा मार्ग आहे. माझे कुटुंब हे एक तटस्थ भूमिका घेणारे कुटुंब आहे. त्यांनी मला फक्त चांगला माणूस बनण्यास शिकवले आहे. 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटामध्ये काश्मिरी पंडितांचा हत्याकांड, त्यांचा नरसंहार दाखवला गेला आहे. तर हिंसा आणि धर्माचे मापदंड केले गेले, तर काही दिवसांपूर्वी एका गायीने भरलेला ट्र्क घेऊन जाणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला मारहाण करत त्याला जय श्री राम म्हणण्यास सांगण्यात आले. ही सुद्धा धर्माच्या नावावर झालेली हत्या आहे. काश्मीरमध्ये जे घडले त्यात आणि मॉब लिचिंगच्या घटनांमध्ये काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत,' असे साई म्हणाली आहे. तिच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे.

या वक्तव्यामुळे सोशल मीडियात पडले दोन गट

साईच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडिया दोन भागात विभागला गेला आहे. काहींनी तिच्या बेधडक वक्तव्यासाठी तिला पाठिंबा दर्शवला आहेत, तर काही तिच्यावर भडकले आहेत. साईने केलेले वक्तव्य काश्मिरी पंडितांच्या शोकांतिकेचे चुकीचे चित्रण करत असल्याचे अनेकांना वाटत आहे. साई पल्लवी एक हुशार मुलगी आहे, असे मी समजत होते, पण तिने मला निराश केले आहे, अशी प्रतिक्रिया एका नेटक-याने दिली आहे. तर मला साई पल्लवीची स्टाइल आवडली, दक्षिण भारतीय कलाकार कधीही सत्य बोलण्यास मागेपुढे पाहात नाहीत, अशी कमेंट करत एका नेटक-याने तिला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

नक्षलवादी चळवळीवर आधारित आहे आगामी चित्रपट

साईचा आगामी चित्रपट 'विराट पर्वम'मध्ये राणा दग्गुबती मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 1990 च्या सत्य घटनेवर आधारित आहे. त्याची पार्श्वभूमी तेलंगणा भागातील नक्षलवादी चळवळ आणि एक प्रेमकथा आहे. या चित्रपटात साई वेनेलाची भूमिका साकारत आहे, जी रवन्ना या नक्षलवादी नेत्याच्या प्रेमात पडते.

बातम्या आणखी आहेत...