आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मधुर भांडारकरांच्या चित्रपटात सईची वर्णी:'इंडिया लॉकडाऊन' या हिंदी चित्रपटात सई ताम्हणकर  दिसणार मुख्य भूमिकेत, चित्रीकरणाला झाली सुरुवात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'इंडिया लॉकडाउन’ असे नाव असलेल्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतंच प्रदर्शित झाले.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर हिची बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या आगामी चित्रपटात वर्णी लागली आहे. इंडिया लॉकडाउन असे या चित्रपटाचे नाव आहे. मागील वर्षी संपूर्ण जगात कोरोनाचा शिरकाव झाला. कोरोनाचा संसर्ग अधिक होऊ नये म्हणून संपूर्ण देशात गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. याच सर्व परिस्थितीवर हा चित्रपट भाष्य करणार आहे.

'इंडिया लॉकडाउन' या चित्रपटात मुख्य भूमिकेत मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सई पुन्हा एकदा हिंदी सिनेमात दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.

'इंडिया लॉकडाउन’ असे नाव असलेल्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतंच प्रदर्शित झाले असून चित्रपटाचा मुहूर्तही संपन्न झाला आहे. मुंबईत चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे.

या चित्रपटात सई ताम्हणकरसह प्रतीक बब्बर, श्वेता बसू प्रसाद, अहाना कुमरा, जरीन शिहाब आणि प्रकाश बेलवाडी मुख्य भूमिकेत दिसतील.