आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजस देवस्करचा चित्रपट:इमरानच्या ‘ग्राउंड झीरो' चित्रपटात झाली सई ताम्हणकरची एंट्री

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इमरान हाश्मी लवकरच ‘ग्राउंड झीरो’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देवस्कर करत आहेत. या चित्रपटात इमरान एका लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाबाबत आणखी एक बातमी समोर आली आहे की, इमरानच्या मिलिटरी ड्रामामध्ये सई ताम्हणकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दोघांचा रोमान्स पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सई इमरानच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. दोन्ही स्टार्सची फ्रेश ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. चित्रपटाच्या कलाकार आणि क्रूने नुकतेच श्रीनगरमधील काम संपवले असून पहलगाममध्ये चित्रीकरण सुरू केले. ‘मिमी’मधील तिच्या अभिनयासाठी सईला खूप कौतुक आणि पुरस्कार मिळाले. ती मधुर भांडारकरच्या ‘इंडिया लॉकडाउन’मध्येही दिसणार आहे. सई बॉलीवूड व्यतिरिक्त मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिने अलीकडेच तिच्या ‘फख्त महिला साथी’ या मराठी चित्रपटाची घोषणा केली. इम्रानबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाव्यतिरिक्त तो सलमान खान आणि कतरिना कैफच्या टायगर ३ मध्ये दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...