आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मिमी’च्या निमित्ताने सईसोबत खास बातचीत:कृती सेननसोबत दिसणार सई ताम्हणकर, म्हणाली - मी कोणत्याही पात्राची मर्यादा ठरवत नाही

उमेश उपाध्याय15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सई सांगते - कृती मोकळ्या स्वभावाची, वेळेची पक्की

अभिनेत्री सई ताम्हणकरचा आगामी सिनेमा ‘मिमी’आहे. याशिवाय ती ‘इंडिया लॉकडाउन’मध्येही दिसणार आहे. ‘दिव्य मराठी’शी झालेल्या मुलाखतीत तिने या चित्रपटासह ठराविक चित्रपट आणि बोल्डनेसवर मनमोकळी चर्चा केली.

  • ‘मिमी’मध्ये तुझे पात्र कसे आहे आणि यासाठी काय तयारी केली?

‘मिमी’मध्ये माझ्या पात्राचे नाव शमा आहे. शमा धाडसी मुलगी असते. शमाचे पात्र साकारुन चांगले वाटले. ही व्यक्तीरेखा साकारण्यासाठी उर्दू शिकावे लागली. वर्कशॉपसाठी दोन महिने आणि भाषेसाठी दीड ते दोन महिने द्यावे लागले. मला पोस्ट रिलीजपेक्षा प्रोसेस चांगली वाटते. चित्रपटाच्या क्रू मेंबरला हा चित्रपट आवडला तर प्रेक्षकांना तो खूप अवाडेल असे मला वाटते.

  • सरोगेसीविषयी तू काय विचार करतेस ?

आपण ज्या वातावरणात वाढलो. त्या वातावरणात या गोष्टी आजही मान्य नाहीत. समाजासाठी हा विषय निषिद्धच आहे. पण मी आजची मुलगी आहे, तर याला एक पर्याय म्हणून पाहायला काही हरकत नाही. याला स्वीकारावे लागेल कारण जग आता बरेच पुढे गेले आहे.

  • तुझ्या बोल्डनेसवर बरेच बोलले गेले, स्टार झाल्यावर लोकांच्या दृष्टिकाेनात बदल जाणवला ?

आता बोल्डनेसची लाइन धूसर झाली आहे, असे मला वाटते. माझ्यासाठी बोल्डनेसचा अर्थ खूपच वेगळा आहे. आज लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. मला वैविध्य आवडते. चांगल्या भूमिका करायला मला आवडतात. पात्रासाठी मी मर्यादा ठरवल्या नाहीत.

  • कृतीबद्दल काय सांगशील?

कृती वाचन आणि सरावादरम्यान वेळेवर यायची. ती खूपच मोकळ्या स्वभावाची आहे. मीदेखील तशीच आहे. त्यामुळे आमच्यात लवकर गट्टी जमली. कृतीने बरेच बॉलिवूड चित्रपट केले आहेत. कलाकार म्हणून ती माझ्याशी खूप चांगली वागली.

बातम्या आणखी आहेत...