आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अथियाच्या लग्नावर वडील सुनील शेट्टीची प्रतिक्रिया:म्हणाले- मला के एल राहुल आवडतो, लग्नाचा निर्णय सर्वस्वी मुलांचा आहे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सुनील शेट्टी यांनी अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार केएल राहुल यांच्या लग्नाच्या बातमीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुनील म्हणाला की, माझ्या मुलीचे कधीना कधी लग्न होईल. मला केएल राहुल खूप आवडतो. यासोबतच त्यांनी तंबाखूच्या जाहिरातीवरही प्रतिक्रिया दिली आहे.

लग्न करण्याचा निर्णय मुलांचा आहे
लग्नाबद्दल सुनील म्हणाले, आथिया माझी मुलगी आहे व तिचे लग्न कधीना कधी होणार आहे. माझ्या मुलाचेही व्हावे अशी माझी इच्छा आहे. माझ्या मुलांचे जितके लवकर लग्न होईल तितके चागंले आहे. केएल राहूल खुप चांगला मुलगा आहे. मला तो आवडतो. लग्न करणाच्या सर्वस्वी निर्णय मुलांचा आहे. कारण आजचा काळ फार बदलला आहे. माझी मुलगी आणि माझा मुलगा दोघेही आता मोठे आहेत आणि एक जबाबदार व्यक्ती आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यातले त्यांचे निर्णय स्वत: घ्यावे कारण चांगेल काय आणि वाईट काय यातला फरक त्यांना नक्कीच कळतो. माझे आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी आहेत.

ना मी संत आहे ना देव
तंबाखूबद्दल सुनील म्हणाले, "जोपर्यंत तंबाखूचा प्रश्न आहे, लोकांनी मला विचारले की तुम्ही आता 61 वर्षांचे आहात आणि अजूनही वृद्ध होत नाही. यामुळे मी म्हातारा होत नाही कारण तंबाखू किंवा गुटखा आणि जे काही मला चुकीचे वाटते ते मी सेवन करत नाही. लोक दारू पितात आणि ते माझ्यापेक्षा जास्त काळ जगू शकतात, हा त्यांचा निर्णय आहे. दारू विकली जाते म्हणून त्याची जाहिरात केली जाते. तंबाखू विकली जाते म्हणून त्याची जाहिरात केली जाते. ज्यांना ते वापरायचे नाही ते ते टाळू शकतात. मी सर्व गोष्टींपासून दूर राहतो. बॉलिवूड इंडस्ट्रीत बरेच काही घडते. याचा अर्थ मी संत आहे असे नाही. मी देवही आहे असे नाही.

भाऊ अहानने दिला होता नकार
दैनिक भास्करशी खास बातचीत करताना अहानने सांगितले होते की, लग्नाची कोणतीही तयारी नाही. तसे काही नाही, या सर्व अफवा आहेत. लग्नच होत नसेल तर कोणी तारीख कशी देणार. साखरपुडाही झालेला नाही. आत्तापर्यंत, त्याच्याकडे कोणतीही योजना नाही. येत्या काही महिन्यांत तत्काळ कोणतेही लग्नाचे नियोजन नाही. असे सांगण्यात आसे आहे.