आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलिया भट्ट लवकरच बदलणार तिचे आडनाव:म्हणाली - मला या सर्व गोष्टी करायच्या आहेत आणि त्याने मला आनंद मिळतो

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान, आलियाने एका मुलाखतीत तिचे आडनाव बदलण्या बद्दल सांगितले. आलिया म्हणाली की, मला माझ्या नावासमोर कपूर नाव लावायला आवडेल. यानंतर ती म्हणाली की, माझे आडनाव लवकरच बदलणार आहे.

आलिया बदलणार तिचे आडनाव

आलियाने सांगितले की, माझे नाव नेहमीच आलिया भट्ट असेल, परंतु लवकरच ती अधिकृतपणे तिचे नाव बदलून आलिया भट्ट कपूर ठेवणार आहे. पासपोर्टमधील नाव बदलण्याबाबत आलिया म्हणाली, 'मी लवकरच माझे आडनाव बदलणार आहे. मला या सर्व गोष्टी करायच्या आहेत. हे करताना मला खूप आनंद होईल. याचवर्षी 14 एप्रिलला आलिया आणि रणबीरचे सोबत लग्न झाले.

मिड डेशी बोलताना आलियाने सांगितले की, ती बऱ्याच दिवसांपासून हा बदल करण्याचा विचार करत होती, पण व्यस्त कामांमुळे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे तिला वेळ मिळत नाही. आलिया तिच्या हॉलिवूड प्रोजेक्ट हार्ट ऑफ स्टोनच्या शूटिंगसाठी जवळपास महिनाभर लंडनमध्ये होती. पासपोर्टवर रणबीरने मॅरेज मॅटेरिअयल स्टेटस बदलल्यानंतर आलिया म्हणाली, "आम्ही आता आई-बाब होणार आहोत. जेव्हा कपूर कुटुंब एकत्र प्रवास करत असेल, मला एकटीलाच भट्ट नाही राहायचे, मी स्वत:ला वेगळे इंट्रोड्यूस नाही करु शकत

रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र' 9 सप्टेंबरला होणार रिलीज

आलिया पुढे म्हणाली, "मी आलिया भट्ट होती आणि नेहमीच राहील आणि आता मी मिसेस कपूर बनले आहे." रणबीर आणि आलिया सध्या त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. या चित्रपटात दोघेही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट 9 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात नागार्जुन, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

आलियाचे आगामी प्रोजेक्ट्स

'ब्रह्मास्त्र' व्यतिरिक्त आलियाकडे करण जोहरचा 'रॉकी आणि राणीची प्रेमकथा' हा चित्रपट आहे. या चित्रपटात आलिया रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. आलिया फरहान अख्तरच्या 'जी ले जरा'मध्ये प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफसोबत दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...