आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक पवन कृपलानी यांच्या ‘भूत पुलिस’ या चित्रपटाची घोषणा झाली. मंगळवारी या चित्रपटाशी संबंधित नवी माहिती समोर आली ती म्हणजे हा चित्रपट या वर्षअखेर फ्लोअरवर येईल आणि त्यात सैफ अली खान आणि अर्जून कपूर प्रमुख भूमिकांत असतील. तत्पूर्वी मागील वर्षी फाॅक्स स्टार स्टुडिओने या चित्रपटाची घोषणा केली होती, तेव्हा त्यात सैफशिवाय अली फझल आणि फातिमा सना शेख ही होते. तूर्तास निर्मात्यांनी या दोघांबाबत काही सांगितले नाही. मात्र जाणकारांच्या मते, हे दोघे आता चित्रपटात नसतील.
सत्य जाणून घेण्यासाठी दैनिक भास्करने सध्याचे निर्माते रमेश ताैरानी, दिग्दर्शक पवन कृपलानी, अली फझल व फातिमाच्या टीमशी संपर्क साधला. मात्र कोणीही मेसेजचे उत्तर दिले नाही. पवन म्हणाले या मुद्द्यावर काही दिवसांनी बोलू.
जाणकारांनी आणखी एक शंका व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, फाॅक्स स्टार इंडिया भूत पुलिसची निर्मिती करणार होते आणि तेव्हा विजय सिंह त्याचे प्रमुख होते. त्यांच्या काळात निर्मित जोया फॅक्टर आणि इंडियाज मोस्ट वाँटेड सारखे चित्रपट आपटले,त्यामुळे या चित्रपटाच्या मार्गात अडचणी आल्या. याच काळात डिस्ने वर्ल्ड वाइडने फाॅक्स स्टार इंडिया विकत घेतले. या स्थितीत निर्मिती संस्थेने हा चित्रपट बाजूला ठेवला होता.
असे असले तरी सैफचा या चित्रपटावरील विश्वास कायम होता. त्याने आपल्या रेस या जुन्या चित्रपटाचा सहकारी आणि भागीदार रमेश तौरानी यांना चित्रपटट सुरू करण्यास राजी केले. त्याशिवाय आणखी सहनिर्माते अक्षय पुरी यांना कार्यकारी मंडळात घेतले आणि अर्जून कपूरची चित्रपटात एंट्री झाली. आता सर्वजण नव्या स्टुडिओच्या शोधात आहेत.
अभिनेता अली फजलने अधिकृतपणे याबाबत काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सूत्रांनी सांगितले की, सहा ते आठ महिन्यांपूर्वी त्यांनी आपली टॅलेंट एजन्सी ‘KRI’ बदलली होती. आता त्यांचे काम अतुल कसबेकर यांची ब्लिंग कंपनीकडे आहे. त्यांच्या जुन्या टॅलेंट एजन्सीचे सहभागीदार श्वेत कौल आणि झाहिद खान आहेत. झाहिद यापूर्वी सैफ आणि करीनाचे व्यवस्थापक होते आणि त्यांच्यांमुळेच गेल्या वर्षी भूत पुलिसमध्ये अलीला एंट्री मिळाली होती. मात्र, आता अली यांनी त्यांची कंपनी सोडली असल्याने अलीला या चित्रपटात जागा मिळालेली नाही.
#SaifAliKhan & @arjunk26 join the cast of 'Bhoot Police'! This spooky adventure comedy to go on floors by the end of this year.@tipsofficial in association with #12thStreetEntertainment presents #BhootPolice, Produced by @RameshTaurani & @puriakshai, Directed by #PavanKirpalani. pic.twitter.com/BNFoLFcDgB
— Tips Films & Music (@tipsofficial) September 1, 2020
IT'S OFFICIAL... #SaifAliKhan and #ArjunKapoor in horror-comedy #BhootPolice... The duo will share screen space for the first time... Directed by Pavan Kirpalani... Produced by Ramesh Taurani and Akshai Puri... Filming begins 2020-end. pic.twitter.com/AQOVgmJ2se
— taran adarsh (@taran_adarsh) September 1, 2020
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.