आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेलर आउट:सैफ अली खान आणि अर्जुन कपूर स्टारर 'भूत पुलिस'चा मजेदार ट्रेलर रिलीज, 17 सप्टेंबरला ओटीटीवर येणार हॉरर-कॉमेडी चित्रपट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2 मिनिट 50 सेकंदाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला सैफ आणि अर्जुनची धमाकेदार एंट्री पाहायला मिळते.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अर्जुन कपूर स्टारर हॉरर-कॉमेडी फिल्म ‘भूत पुलिस’चा ट्रेलर बुधवारी रिलीज झाला आहे. अर्जुन कपूरने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. पोस्टमध्ये ट्रेलर शेअर करताना अर्जुनने लिहिले, 'हा हॉरर-कॉमेडी चित्रपट असण्यासोबतच युनिकदेखील आहे. भूतांना घाबरवायचे असेल तर नक्की बघा. भूत पुलिस येत आहेत 17 सप्टेंबरला डिस्ने प्लस हॉटस्टारवर.'

त्या दोघांसोबतच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम देखील चित्रपटात झळकणार असल्याचे दिसत आहे. ट्रेलरमध्ये सैफ आणि अर्जुन हे एकमेकांच्या पूर्णपणे उलट दाखवले आहेत. सैफ हा सतत मजा मस्ती करणारा तर अर्जुन हा सतत पुस्तकातील गोष्टींचा अभ्यास करताना दिसत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

17 सप्टेंबरला रिलीज होणार चित्रपट
चित्रपटात सैफ आणि अर्जुन यांनी विभूती आणि चिरौंजी हे पात्र साकारले आहेत. तर यामी गौतमच्या पात्राचे नाव माया तर जॅकलिनच्या पात्राचे नाव कनिका आहे. रमेश तौरानी आणि अक्शई पुरी या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर पवन कृपलानी याचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट 10 सप्टेंबर 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. आता हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 17 सप्टेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...