आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'हम-तुम'ची 16 वर्षे:दिग्दर्शक कुणाल कोहलीसोबत झाले होते सैफ अली खानचे भांडण, ऋषी कपूर यांच्या मध्यस्तीमुळे मिटले होते भांडण  

मुंबई (अंकिता तिवारी)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'हम तुम'साठी सैफ नव्हता पहिली पसंती... तिक रोशन, आमिर खान आणि विवेक ओबेरॉयने नकार दिल्यानंतर लागली होती चित्रपटात वर्णी...

2004 मध्ये रिलीज झालेल्या 'हम तुम' या चित्रपटाच्या रिलीजला आज 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. राणी मुखर्जी, सैफ अली खान आणि ऋषी कपूर स्टारर या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. चित्रपटाला 16 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने याचे दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी त्यासंबंधित बर्‍याच रंजक गोष्टी शेअर केल्या आहेत.

  • ऋषी कपूर यांनी दिला होता नकार

जेव्हा मी या चित्रपटाची ऋषी कपूर यांना ऑफर दिली होती, तेव्हा चित्रपटात त्यांचे केवळ 7 सीन होते. त्यांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. मला मोठ्या चित्रपटात काम करणे पसंत आहे, केवळ 7 सीन असलेल्या चित्रपटात मी काम करु शकत नाही, असे ते मला म्हणाले होते. पण जेव्हा मी त्यांना प्रत्येक सीन वाचून दाखवला, तेव्हा त्यांना स्क्रिप्ट आवडली आणि त्यांनी हा चित्रपट करण्यास सहमती दर्शविली.

  • जेव्हा सैफसोबत माझे भांडण झाले होते...

'हम तुम' हा माझ्या कारकिर्दीचा दुसरा चित्रपट होता, तर पहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी केली नव्हती. हम तुमच्या शूटच्या वेळी सेटवर सैफबरोबर माझे भांडण झाले होते. त्यावेळी ऋषीजी देखील तिथे उपस्थित होते आणि त्यांनी आम्हा दोघांनाही फटकारले आणि म्हटले की, मोठ्यांसारखे वागा, लहान मुलांसारखे भांडू नका. मग मी जाऊन सैफशी बोललो आणि त्याला समजावून सांगितले की हा चित्रपट आपल्या दोघांच्या करियरसाठी खूप महत्वाचा आहे. त्यावेळी सैफचे काही चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यानंतर सैफला परिस्थिती समजली आणि आम्ही पुन्हा मैत्री केली आणि पुन्हा कधीही भांडलो नाही.

  • अ‍ॅनिमेशन वापरण्यासाठी लोकांनी विरोध दर्शवला होता

आजही हिंदी चित्रपटांमध्ये जास्त अ‍ॅनिमेशन वापरले जात नाही,  त्यामुळे 16 वर्षांपूर्वी चित्रपटात अ‍ॅनिमेशनचा वापर करणे, हे एक मोठे पाऊल होते. त्यावेळी यशराजच्या बर्‍याच लोकांनी मला चित्रपटातून अ‍ॅनिमेशन काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे चित्रपटात काहीच बदल होणार नाही, असे त्यांचे मत होते. अ‍ॅनिमेशनचे एकूण बजेट पन्नास लाख रुपये होते आणि मला सांगण्यात आले होते की एवढ्या पैशांत मी एखादे गाणे शूट करू शकतो, परंतु तरीही मी हे अॅनिमेशन वापरले आणि चित्रपटाच्या रिलीजनंतर प्रत्येकाला माझी ही संकल्पना आवडली.

  • राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला पुरस्कार मिळाला

त्यावेळी राणी मुखर्जी अनेक सुपरहिट चित्रपटांचा एक भाग होती पण तरीही ती सेट्सवर खूप सहकार्य करायची. आम्ही सर्वजण खूप दबावात होतो, कारण हा चित्रपट अगदी कमी बजेटमध्ये बनविण्यात आला होता. मला आठवतंय की, हा पहिला चित्रपट होता, ज्यासाठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. आज इंडस्ट्रीमध्ये एक रोमँटिक कॉमेडी फिल्म बनवण्यात लोक संकोच करतात. पण मला वाटतं की, हम तुमने हिंदी सिनेमात बदल घडवून आणला आणि या चित्रपट हिट ठरल्यानंतर लोक रोमँटिक कॉमेडी बनवण्याचा प्रयत्न करु लागले आहेत.  जर 'हम तुम' नसता तर कदाचित 'जब वी मेट'देखील नसता आणि बरेच रोमँटिक विनोदी चित्रपटही नसते. मला वाटतं ही प्रथा हम तुमने सुरू केली होती.

  • सैफ नव्हता माझी पहिली पसंत

स्क्रिप्ट पूर्ण होताच मी राणी मुखर्जीला या चित्रपटासाठी अभिनेत्री म्हणून निवडले होते, त्यापूर्वी हृतिक रोशन, आमिर खान आणि विवेक ओबेरॉय या तीन कलाकारांनी चित्रपट करण्यास नकार दिला होता. त्यानंतर या चित्रपटासाठी मी सैफ अली खानला संपर्क साधला. मला वाटतं की सैफ हम तुमचा भाग नसता तर कदाचित हा चित्रपट बनला नसता.

बातम्या आणखी आहेत...