आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफिनाच्या दुसऱ्या मुलाच्या नावावरून वाद:दुसऱ्या मुलाच्या नावावरून करीना कपूर आणि सैफ अली खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर,  म्हणाले - तिसऱ्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवणार का?

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करीना कपूर आणि सैफ अली खानच्या दुसऱ्या मुलाचे नाव समोर आले आहे.

सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव समोर आले आहे. पहिला मुलगा तैमूरप्रमाणेच सैफिनाने त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नावही मुघल बादशहाच्या नावावर ठेवले आहे. सैफ आणि करीनाने त्यांच्या धाकट्या मुलाचे नाव जहांगीर अली खान असे ठेवले आहे. सोमवारी सोशल मीडियावर लाइव्ह चॅट दरम्यान करीनाने स्वतः याची पुष्टी केली. आता दुसऱ्या मुलाचे नाव समोर आल्यानंतर सैफ आणि करीना ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. पहिल्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यानंतरही ते ट्रोल झाले होते.

करीना कपूरने तिचे पुस्तक 'प्रेग्नेन्सी बायबल'च्या प्रमोशनच्या निमित्ताने करण जोहरसोबत एक सोशल मीडिया लाइव्ह चॅट सेशन केले होते. यावेळी तिने तिच्या गर्भधारणेविषयी अनेक खुलासे केले. या लाइव्ह सेशन दरम्यान करीनाने तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर ठेवले असल्याचे सांगितले. पण यापूर्वी करीनाने तिच्या लहान मुलाचे नाव जेह अली खान ठेवले असल्याचे समोर आले होते. पण जेह हे त्याचे टोपणनाव असल्याचे आता समोर आले आहे.

मुलाचे नाव जहांगीर ठेवल्याने झाले ट्रोल
सैफ आणि करीनाच्या लहान मुलाचे खरे नाव जहांगीर आहे. हे समजल्यावर लोकांनी सोशल मीडियावर सैफिनाला ट्रोल करायला सुरुवात केली आणि मीम्सचा पाऊसही पाडला.एका नेटक-याने लिहिले, "तैमूर आणि जहांगीर नंतर आता सैफिना तिसऱ्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवणार?'

तर एक नेटकरी म्हणाला, "करीना आणि सैफ मुलाचे नाव कलाम. इरफान, जाकीर काहीही ठेवू शकले असते. मात्र तैमूर आणि जहांगीर का ठेवले? तर शिख आणि हिंदूंना कमी लेखण्याचा हा एक डाव आहे. असे वाटतंय करीना आणि सैफ मुघलांची आयपीएल टीम तयार करत आहेत."

जहांगीर कोण होता?
मुघल बादशहा अकबरचा मुलगा सलीम याचे नाव जहांगीर होते. जहांगीर हा पारशी शब्द आहे ज्याचा अर्थ जगावर राज्य गाजवणारा असा आहे. जहांगीरचे खरे नाव नूर-उद-दीन मोहम्मद सलीम होते. जहांगीरचा जन्म 31 ऑगस्ट 1569 रोजी झाला होता. जहांगीरने 1605 पासून 1627 मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत भारताची सत्ता सांभाळली. 1599 मध्ये, जेव्हा अकबर इतर युद्धांमध्ये व्यस्त होता, तेव्हा त्याने जहांगीरला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. यानंतर, जहांगीरचा 1605 मध्ये मुघल सम्राट म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. लाहोर प्रवासादरम्यान 28 ऑक्टोबर 1627 रोजी त्याचे निधन झाले होते.

बातम्या आणखी आहेत...