आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संताप:सुशांतच्या शेवटच्या चित्रपटात को-अ‍ॅक्टर राहिलेला सैफ म्हणाला - 'आता लोक प्रेम व्यक्त करत आहेत, पण तो नैराश्येमध्ये असताना हे कुठे होते?'

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सैफने सुशांतसोबत त्याचा शेवटचा चित्रपट ठरलेल्या 'दिल बेचारा'मध्ये काम केले, जो लॉकडाऊननंतर रिलीज होईल.

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्याच्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पण तो नैराश्येमध्ये असताना हे कलाकार कुठे होते? असा प्रश्न अभिनेता सैफ अली खानने उपस्थित केला आहे.  या प्रकरणात काळजी असण्याचे ढोंग करण्यापेक्षा एक दिवसाचे मौन बाळगणे अधिक चांगले आहे, असे सैफ म्हणाला आहे. 

'हे लाजीरवाणे आहे'

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सैफ म्हणाला, “दुर्दैवी बाब म्हणजे काही लोकांनी या घटनेचा स्वत:च्या प्रसिद्धीसाठी वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. सुशांत नैराश्येमध्ये असताना त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही आणि आता प्रत्येक जण त्याच्यासाठी प्रेम व्यक्त करतायत. हे केवळ ढोंग आहे, बाकी काही नाही. ही मंडळी केवळ सुशांतचा अपमान करत आहेत.”

चाहत्यांच्या सहानुभूतीसाठी प्रेमाचे ढोंग 

सैफने कबुली दिली की, इंडस्ट्रीत कोणालाही कोणाची काळजी नसते आणि सर्वांना फक्त त्यांच्या चाहत्यांची सहानुभूती हवी असते. सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहिणा-या लोकांकडून वास्तविक जीवनात प्रेम आणि सहानुभूतीची अपेक्षा नसल्याचे तो म्हणाला आहे. 

सैफ म्हणतो, "आपण अशा युगात जगत आहोत जिथे ट्विटरवर लोक तुमच्यासाठी 10 ओळी लिहितील आणि तुम्हाला रस्त्यावर मागे सोडतील. तुम्हाला स्पर्शही करणार नाही किंवा हातही पुढे करणार नाही. तुम्हाला वढदिवसाच्या शुभेच्छा देतील, पण प्रत्यक्षात ते तुम्हाला कॉल देखील करणार नाहीत.'

शेखर कंगनाशी पूर्णपणे सहमत नाही

अलीकडेच चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी सुशांतच्या मृत्यूवर लिहिले की, "सुशांत तुझ्या वेदनांची तुला ज्या लोकांनी दूर लोटले आणि निराश केले त्या लोकांबाबत मला माहीत आहे. त्यांच्याबद्दल सांगताना तू माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन रडत होतास. गेल्या सहा महिन्यात तू तुझ्याबरोबर असायला हवा होतो. मला वाटते तू माझ्याशी बोलायला हवे होते. तुझ्यासोबत जे काही घडले ते त्यांचे कर्म आहे तुझे नाही."  तर कंगना रनोटनेही सोशल मीडियावरील व्हिडीओमध्ये संतप्त स्वरात म्हटले की, सुशांत आउटसाइडर असल्याने त्याला इंडस्ट्रीत महत्त्व मिळाले नाही. याच्याशी, सैफ पूर्णपणे सहमत नाही.

"लोक सतत लोकांना अपयशी ठरवतात. प्रत्येकजण त्यांच्याबद्दल बोलत असतो. अगदी आपण अयशस्वी झालात किंवा आपण अपयशी नाहीत असे म्हणणारेही कुठेतरी त्यांच्या नावाचा गैरफायदा घेत आहेत", असे मत सैफने व्यक्त केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...