आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी एका स्टारकिडची बॉलिवूडमध्ये एंट्री:सैफ अली खानचा खुलासा, त्याचा 20 वर्षीय मुलगा इब्राहिम 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटात करण जोहरला करतोय असिस्ट

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 20 वर्षीय इब्राहिम करण जोहरला त्याच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटात असिस्ट करत आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान पतौडी यानेही बॉलिवूड क्षेत्रात पाऊल टाकले आहे. सैफने खुलासा केला आहे की, त्याचा थोरला मुलगा इब्राहिम त्याच्या आगामी चित्रपटात करण जोहरला असिस्ट करत आहे. 20 वर्षीय इब्राहिम करणला त्याच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटात असिस्ट करत आहे. सैफने सांगितल्यानुसार, त्याचे त्याच्या चारही मुलांसोबत (सारा, इब्राहिम, तैमूर आणि जहांगीर) वेगळे बाँडिंग आहे.

सैफ म्हणाला, 'इब्राहिम करणला असिस्ट करत आहे, त्यामुळे त्याच्याशी माझे बहुतेक वेळा त्याचे बॉलिवूड प्लान्स, आयडिया आणि त्याच्या स्वप्नांबद्दल बोलणे होते. सारा वयाने मोठी आहे, म्हणून तिच्याशी माझे समीकरण वेगळ्या पातळीचे आहे. तैमूरला माझ्याकडून मार्गदर्शन हवे असते आणि जेह माझ्याकडे पाहून फक्त हसतो आणि माझ्याशी खेळतो.'

सैफ-अमृताचा मुलगा आहे इब्राहिम
इब्राहिम हा सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांचा मुलगा आहे. 20 वर्षीय इब्राहिम काही मासिकांच्या कव्हर आणि प्रिंट जाहिरातींमध्येही दिसला आहे. एका मुलाखतीत सैफला विचारण्यात आले होते की, जर त्याची मुले (इब्राहिम अली खान, तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान) यांना भविष्यात चित्रपटांमध्ये स्थान निर्माण करायचे असेल, तर तो आपल्या मुलांना काय सल्ला देईल?

यावर प्रतिक्रिया देताना सैफ म्हणाला होता, 'मी त्यांना सांगेन की तुमच्या आजूबाजूला बरेच लोक आहेत - मोठे स्टार्स आणि महान अभिनेते, त्यांच्याकडून शिका. चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. चुका करा, नक्कीच करा, पण या जगात जिथे तुम्ही राहता, त्यासाठी आपले योगदान द्या आणि जर योगदान देण्यासाठी मनोरंजन क्षेत्र निवडले असेल, तर लोकांचे भरपूर मनोरंजन करा.'

तैमूर, इब्राहिम आणि सारासोबत सैफ अली खान.
तैमूर, इब्राहिम आणि सारासोबत सैफ अली खान.

मुुलाला अभिनेता बनवू इच्छित नाही करीना
तसे पाहता सैफला त्याच्या मुलांना अभिनेता बनवायचे आहे, पण करीनाला तिच्या मुलांनी (तैमूर आणि जहांगीर) चित्रपटात काम करावे असे वाटत नाही. एका मुलाखतीत करीनाने म्हटले होते, तैमूरने माझ्याकडे येऊन मला एव्हरेस्ट चढायचे आहे असे सांगितले तर मला जास्त आनंद होईल. माझ्या मुलांना ज्या क्षेत्रात पुढे जायचे आहे, त्यासाठी मी त्यांना नेहमी पाठिंबा देईन. पण त्यांनी मुव्ही स्टार व्हावे असे मला वाटत नाही. सैफ-करीनाने 2012 मध्ये लग्न केले होते, त्यांना तैमूर आणि जहांगीर ही दोन मुले आहेत.

बातम्या आणखी आहेत...