आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नवीन सुरुवात:जुने घर भाड्याने देऊन नवीन घरात करीना आणि तैमूरसोबत शिफ्ट होतोय सैफ अली खान, रिनोव्हेशनवर स्वतः लक्ष ठेऊन आहे सैफ 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सैफ अली खान सध्या वांद्रे भागातील फॉर्च्यून इमारतीत आपल्या कुटुंबासमवेत राहत आहे.

अभिनेता सैफ अली खान लवकरच आपल्या कुटूंबासह नवीन घरात शिफ्ट होणार आहे. याचे कारण म्हणजे सध्या हे कुटुंब ज्या घरात वास्तव्याला आहे, तेथील जागा त्यांना अपुरी पडत असल्याचे सांगितले जात आहे. पटौदी घराणे खूप मोठे आहे आणि त्यांच्या घरी बरेचदा पाहुणे येत असतात. त्यामुळे त्यांना हे घर लहान पडत आहे. आता त्यांच्या नवीन घराचा शोध पूर्ण झाला असून सैफ लवकरच करीना आणि तैमूरसोबत तिथे राहायला जाणार आहे. सध्या नवीन घरामध्ये नूतनीकरणाचे काम चालू आहे जे सैफ त्याच्या देखरेखीखाली करत आहे.

View this post on Instagram

Work from home they said...

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on Apr 7, 2020 at 12:45am PDT

सैफ अली खान सध्या वांद्रे भागातील फॉर्च्यून इमारतीत आपल्या कुटुंबासमवेत राहत आहे. या इमारतीसमोर त्याचे नवीन घर असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, स्वत: सैफ आपल्या नवीन घराच्या नूतनीकरणाच्या कामावर लक्ष ठेऊन आहे. सैफ म्हणाला, 'सध्या आमच्या नवीन घराचे नूतनीकरण होत आहे, त्यामुळे मी तेथे येत जात असतो. मी या वेळी माझ्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. माझी बहीण सोहा आणि तिचा नवरा कुणाल अधूनमधून आमच्या घरी येतात आणि बर्‍याचदा माझी मुले सारा आणि इब्राहिमसुद्धा येतात. माझी दुसरी बहीण सबा देखील मुंबईला आली आहे. फक्त माझी आई (शर्मिला टागोर) दिल्लीत भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटमध्ये आहे, कारण जेव्हा तिचे घर बांधले जात होते तेव्हा तिथे लॉकडाऊन झाले होते. सध्या ती दिल्लीतील आपल्या घराचे नूतनीकरण करत आहे.'

  • मास्क न घातल्याने ट्रोल झाले होते 

लॉकडाऊन दरम्यान  सैफ, करीना आणि त्यांचा मुलगा तैमूर हे तिघेही मरीन ड्राइव्ह परिसरात फेरफटका मारायला गेले होते. यावेळी सैफने चेहऱ्यावर मास्क न लावल्यामुळे त्याच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली होती. याबद्दल बोलताना सैफने मुंबई मिररला सांगितले होते की, ''सलग तीन महिने आम्ही सगळे घरीच होता, त्यामुळे आमच्यासोबत आम्ही तैमूरलादेखील फिरायला घेऊन गेलो होतो. आमच्या तिघांजवळ मास्क होते. परंतु, त्यावेळी फिरत असताना आमच्या आसपास कोणी नव्हते म्हणून मी तो मास्क काढून ठेवला होता. काही वेळातच आमच्या लक्षात आले की समोरुन काही लोक येत आहेत आणि त्या ठिकाणी लहान मुलांना नेण्याची परवानगी नाही. त्याच क्षणी आम्ही चेहऱ्यावर मास्क लावले आणि परत घरी परतलो.''