आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'भूत पुलिस'च्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग संपले:सैफ-करीना मुलगा तैमूरसह पालमपूर घेतला सुट्टीचा आनंद, सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • येथील स्थानिक लोकांनी सैफ आणि करीनासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आपल्या आगामी 'भूत पुलिस' या हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलचे शूटिंग पूर्ण करुन सोमवारी हिमाचल प्रदेशहून मुंबईला परतला आहे. मुंबईला परतण्यापूर्वी सैफने धर्मशाळा आणि पालमपूरमध्ये पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर खान आणि मुलगा तैमूरसोबत क्वालिटी वेळ घालवला.

बेबो आणि सैफ इथल्या खेड्यात फिरले. त्यांनी येथील टी स्टेटलाही भेट दिली. येथे त्यांनी धर्मशाला-पालमपूरमधील स्थानिक लोकांसह फोटोही काढले. पतौडी फॅमिलीच्या या टूरचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

येथील स्थानिक लोकांनी सैफ आणि करीनासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याशिवाय त्यांनी पालमपुरात येऊन स्थानिक पर्यटनाला प्रोत्साहन दिल्याबद्दल करीना आणि सैफ यांचे आभारदेखील मानले आहेत.

एका फोटोमध्ये सैफ आणि बेबो दुपारच्या जेवणाचा आनंद घेताना दिसत आहेत. तर आणखी एका फोटोत हे दोघेही एका चहाच्या दुकानात उभे आहेत. यापूर्वी करीना कपूरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता आणि लिहिले होते, 'बाय-बाय पालमपूर. हा एक चांगला अनुभव होता. नमस्कार मुंबई, मी घरी येत आहे.'

दुसर्‍या शेड्युलचे शूटिंग 15 डिसेंबरपासून मुंबईत सुरू होईल
सैफच्या आगामी 'भूत पुलिस' या चित्रपटाचे पहिल्या टप्प्यातील चित्रीकरण हिमाचल प्रदेशात विविध ठिकाणी करण्यात आले. आता निर्माते चित्रपटाच्या दुसर्‍या शेड्यूलचे शूटिंग 15 डिसेंबरपासून मुंबईत सुरू करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन कृपलानी करत आहेत. या चित्रपटात सैफ व्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिस, यामी गौतम, अर्जुन कपूर आणि जावेद जाफरी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser