आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा खलनायक होणार सैफ अली खान:दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसू शकतो सैफ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निर्माते सैफला चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी घेऊ इच्छित आहेत.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचा आगामी चित्रपट ‘आरआरआर’ सध्या चर्चेत आहे. या चित्रपटानंतर ज्युनियर एनटीआर ‘अला वैकुंठपुरमलो’चे दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांचा चित्रपट करणार आहेत. यात रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. याचे शूटिंग लवकरच सुरू होणार होते, मात्र वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे याला उशीर होऊ शकतो. सध्या ज्युनियर एनटीआर ‘आरआरआर’चे शूटिंग पूर्ण करण्यात व्यग्र आहे.

‘आरआरआर’चे काम पूर्ण होताच ज्युनियर एनटीआर यावर काम सुरू करतील. आता या चित्रपटाविषयी एक मजेदार माहिती समोर आली आहे. ती म्हणजे यात खलनायकाच्या रूपात सैफ अली खानची एंट्री होणार आहे. निर्माते सैफला चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी घेऊ इच्छित आहेत. सर्व काही जुळून आले तर 'तान्हाजी' स्टार सैफ अली खान पुन्हा एकदा पडद्यावर खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.

खरं तर सैफ ‘आदिपुरुष’मध्येही प्रभाससोबत दिसणार आहे. यात तो रावणाच्या भूमिकेत आहे. यापूर्वी अजय देवगण स्टारर 'तान्हाजी’ या चित्रपटात सैफच्या नकारात्मक भूमिकेचे कौतुक झाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा एका दमदार भूमिकेतून सैफ प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...