आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफने सांगितले सोशल मीडियावर न येण्याचे कारण:म्हणाला - मला कोणत्याही 'झंझट'मध्ये पडायचे नाही

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानला अलिकडेच एका मुलाखतीत विचारण्यात आले की, तो सोशल मीडियापासून दूर का राहतो? याच्या उत्तरात तो म्हणाला की, मला कोणत्याही झंझटमध्ये पडायचे नाही. मात्र पैसे कमावण्यासाठी मी सोशल मीडियावर येऊ शकतो. सोशल मीडियाच्या बाबतीत करिना आणि सैफ एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. एकीकडे करिना सोशल मीडियावर खूप सक्रीय असते, तर सैफ मात्र यापासून खूप दूर आहे.

लोक म्हणतील की हे शेअर करू नको

सैफ म्हणाला, 'मी ठिकठाक फोटोजेनिक व्यक्ती आहे. मात्र माझे टनावारी फोटो असतील जे दबलेले राहतात. कारण मला गोष्टी रेकॉर्ड करून ठेवायला आवडते. तसे मी शेअरही करू शकतो. पण मग लोक म्हणतील हे शेअर करू नको, ते शेअर करू नको.'

सैफने त्याच्या करिअरची सुरुवात यश चोप्रांचा चित्रपट 'परंपरा' मधून केली होती.
सैफने त्याच्या करिअरची सुरुवात यश चोप्रांचा चित्रपट 'परंपरा' मधून केली होती.

मला कोणत्याही 'झंझट'मध्ये पडायचे नाही

सैफ पुढे म्हणाला, 'मला आपले अकाऊंट मॅनेज करण्यासाठी एखाद्या मॅनेजरशी बोलावे लागेल. मग ते म्हणतील मी असे करणे पॉलिटिकली चूकीचे ठरेल. त्यामुळे मी असे करण्यात काहीच अर्थ नाही. तेव्हा एक लाख लोक मला म्हणतील की तुम्ही हा फोटो पोस्ट करून असे करू शकतात. यामुळे मला त्या झंझटमध्येच पडायचे नाही.'

पैसा कमावण्यासाठी सोशल मीडियावर येऊ शकतो

सैफ पुढे बोलताना म्हणाला की, 'एक कारण आहे की मी सोशल मीडिया वापरण्याचा विचार करू शकतो. या माध्यमातून खूप पैसा कमावला जाऊ शकतो. केवळ हीच एकमेव गोष्ट आहे जी मला त्याचा वापर करण्यास आकर्षित करू शकते.'

आदिपुरुषमध्ये रावणाच्या भूमिकेत

सैफ अली खान नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'विक्रम वेधा' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात एक गँगस्टर आणि पोलिसातील थ्रिलर खेळ दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट दक्षिणेतील 'विक्रम वेधा' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 180 कोटींत बनलेल्या या चित्रपटाने केवळ 5 दिवसांतच 82 कोटींची कमाई केली होती. सैफ आता आदिपुरुष या चित्रपटात दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...