आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भूत पुलिस’ अपडेट:रमेश तौरानींच्या 'भूत पुलिस'मध्ये ढोेंगी बाबा बनला अर्जुन, तर नकारात्मक भूमिकेत सैफ अली खान

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटाची कथा हिमाचल प्रदेशातील डलहौजीमध्ये सेट करण्यात आली आहे.

सैफ अली खान सध्या नकारात्मक भूमिका करण्यास रस दाखवत अाहे. एकीकडे तो ‘आदिपुरूष’मध्ये रावणाच्या भूमिकेत आहे तर दुसरीकडे आता तो रमेश तौरानी यांच्या 'भूत पुलिस’ चित्रपटातदेखील नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. चित्रपटात सैफ आणि अर्जुन सख्या भावाची भूमिका साकारणार आहेत. यात दोघेही ढोंगी बाबाच्या भूमिकेत आहेत. अर्जुनच्या जीवनात काही तत्त्व असतात तर सैफ फक्त लोकांना मूर्ख बनवण्यात पटाईत असतो.

लोककथेतून सुचली भूताची कथा
या चित्रपटाची कथा हिमाचल प्रदेशातील डलहौजीमध्ये सेट करण्यात आली आहे. किचकंडी नावाच्या भूताच्या आधारित आहे. हा विषय तेथील लोककथेतून घेण्यात आला आहे. किचकंडी भूताच्या कथा नेपाळच्या डोंगराळ भागातही लोकप्रिय आहेत. जीवंत असताना तिला खूप चुकीची वागणूक मिळाली होती आणि गरोदरपणात तिचा मृत्यु झाला होता, अशी लोककथा आहे. निर्मात्यांनी 'स्त्री’ आणि 'रूही’प्रमाणेच याला हॉरर-कॉमेडी टच दिला आहे. दाेघे ढोंगी बाबा त्या किचकंडी भूताला पळवण्यासाठी हिमाचलच्या एका गावात जातात.

राजस्थान आणि गुजरातेतही फिरते कथा
‘भूत पुलिस’मध्ये जावेद जाफरीचीदेखील मुख्य भूमिका आहे. चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. यात भूताचा भाग काल्पनिक आहे. यातील पहिला भाग हिमाचलमध्ये दाखवण्यात आला आहे. त्यानंतर कथा गुजरात आणि राजस्थानमध्येही फिरते. निर्मात्यांनी तेथून दोन डझन स्थानीय कलाकारांनादेखील घेतले आहे.

'स्कॅम' फेम प्रतीकच्या जागी अमितला मिळाली होती भूमिका
दिवंगत अभिनेता अमित मिस्त्रीचीदेखील आहे महत्त्वाची भूमिका. त्याचे याच वर्षी एप्रिलमध्ये निधन झाले. हा अमितचा शेवटचा चित्रपट ठरला. मजेदार म्हणजे त्यांना ज्या भूमिकेसाठी घेतले होते त्यासाठी ‘स्कॅम’ फेम प्रतीक गांधीनेही ऑडिशन दिले होते. मात्र त्यावेळी स्कॅम रिलीज झाला नव्हता आणि प्रतीक गांधी आजच्या सारखा लोकप्रियही नव्हता. आता सध्या प्रतीककडे डझनभर चित्रपट आहेत.

'गाेलमाल अगेन' ठरला आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा हॉरर कॉमेडी

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक यशस्वी भय आणि विनोदीपट बनले आहेत. यापैकी काही चित्रपटानी प्रचंड कमाई केली. यात भूल भुलैया, गो गोवा गॉन, गोलमाल अगेन, स्त्री आणि रूही चित्रपटाचा समावेश आहे. जाणून घ्या त्यांची कमाई..

  • गोलमाल अगेन - 311.18 कोटी
  • स्त्री - 180 कोटी
  • भूल भुलैया - 82.35 कोटी
  • रूही - 30 कोटी
  • गो गोवा गॉन - 37.82 कोटी
बातम्या आणखी आहेत...