आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफ-करीनाची प्रॉपर्टी:सैफ-करीना वांद्र्यातील जुने घर दिले भाड्याने, दरमहा साडेतीन लाख रुपये आहे भाडे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे घर तीन वर्षांसाठी भाड्याने देण्यात आले आहे.

अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी मुंबईतील फॉर्च्युन हाइट्समधील त्यांचे जुने घर भाड्याने दिले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सैफ-करीनाने त्यांचे 1500 चौरस फुटांचे घर दरमहा 3.5 लाख रुपये भाड्याने दिले आहे. असोसिएशन मीडिया एलएपी या फर्मने 15 लाख डिपॉजिट भरून घर रजिस्टर केल्याची माहिती समोर येत आहे. दोन कार पार्किंगसाठी जागा या अपार्टमेंटमध्ये देण्यात आली आहे. हे घर तीन वर्षांसाठी भाड्याने देण्यात आले असून दरवर्षी घराचे भाडे वाढत जाणार आहे.

करीनाने सोशल मीडियावर नवीन घराची झलक शेअर केली.
करीनाने सोशल मीडियावर नवीन घराची झलक शेअर केली.

मुलगा जहांगीरच्या जन्मापूर्वी नवीन घरात झाले शिफ्ट

सैफ-करीना 2012 पासून वांद्र्यातील फॉर्च्यून हाइट्समध्ये असलेल्या या अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांचे लग्न देखील याच घरात झाले होते. 2016 मध्ये मुलगा तैमूरच्या जन्मापासून ते दुसरा मुलगा जेहच्या जन्मापूर्वीपर्यंत ते येथेच वास्तव्याला होते. 2020 मध्ये जेव्हा करीना दुसऱ्यांदा गर्भवती झाली, तेव्हा तिने आणि सैफने नवीन घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. जुन्या घरातील जागा त्यांना अपुरी पडत असल्याचे म्हटले गेले होते. पतौडी घराणे खूप मोठे आहे आणि त्यांच्या घरी बरेचदा पाहुणे येत असतात. त्यामुळे त्यांना हे घर लहान पडत होते. त्यामुळे सैफ-करीनाने या घरासमोरच एक मोठा अपार्टमेंट विकत घेतला, करीनाच्या डिलिव्हरीपूर्वीच या नवीन घराचे रेनोव्हेशनचे काम पूर्ण करण्यात आले आणि सैफ-करीना या नवीन घरात शिफ्ट झाले.

सैफ-करीना सध्या मालदीवमध्ये आहेत

सैफ अली खानने 16 ऑगस्ट रोजी आपला 51 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने सध्या तो संपूर्ण कुटुंबासोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान, सैफची पत्नी करीना कपूर खानने मालदीवमधील खास फोटो शेअर केले आहेत. करीनाने शेअर केलेल्या पहिल्या फोटो सैफ, करीना, तैमूर, जेह (जहांगीर) हे चौघेजण दिसत आहे. तर एका फोटोत सैफ आणि करीना स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत.

करीना आणि सैफच्या कामाबद्दल सांगायचे म्हणजे करीना कपूर लवकरच आमिर खानसोबत 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. दुसरीकडे, सैफ लवकरच 'भूत पुलिस', 'आदिपुरुष', 'बंटी और बबली 2' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. सैफच्या 'भूत पुलिस' या चित्रपटाचा ट्रेलर 18 ऑगस्ट रोजी रिलीज होईल, तर चित्रपट 10 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात सैफसह अर्जुन कपूर, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस देखील दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...