आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफ-करीनाच्या छोट्या मुलाचे नाव समोर आले:सैफिनाने दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर ठेवले, पहिल्या मुलाचे नाव तैमूर ठेवण्यावरून झाला होता वाद

मुंबई4 महिन्यांपूर्वीलेखक: अमित कर्ण
  • कॉपी लिंक

फिल्म स्टार सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव समोर आले आहे. तैमूर प्रमाणेच लहान मुलाचे नावही मुघल बादशहाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. धाकट्या मुलाचे नाव जहांगीर अली खान असे ठेवण्यात आले आहे. करीनाच्या कुटुंबातील सदस्यानेही याला दुजोरा दिला आहे. तथापि, त्याने सांगितले की केवळ करीना आणि सैफच नाव जाहीर करतील.

सैफ अली खान आणि करीना कपूर खानच्या कुटुंबातील एका प्रमुख सदस्याने भास्करला सांगितले, 'मूल सैफ आणि करीनाचे आहे. अशा स्थितीत नाव ठेवण्याचा अधिकारही त्यांचाच आहे. सैफ-करीनाच्या मोठ्या मुलाचे नाव तैमूर ठेवण्यात आम्हाला ना आक्षेप होता आणि ना धाकट्या मुलाचे नाव जहाँगीर ठेवण्यात आम्हाला आक्षेप आहे.

पुढे ते म्हणाले, 'असेही, तैमूरचे घरातील नाव टिमटिम असून ते खूप सुंदर आहे. लहान मुलाचे घरगुती नाव जेह आहे. आता अधिकृतपणे जहांगीर आहे. त्यामुळे आम्हाला या नावाचीसुद्धा काही अडचण नाही. “सैफ ज्या धर्माचा आहे, त्या धर्माचे नाव देण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. मुलगा त्या दोघांचा आहे, यामुळे त्या दोघांनाही अधिकृत घोषणा करण्याची परवानगी दिली तर चांगले राहील. मी सध्या या मुद्द्यावर स्वतः कोट करवून घेऊ इच्छित नाही."

सोमवारी, करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या नावाबाबत दिवसभर चर्चा सुरू होती. ही बाब तेव्हा समोर आली जेव्हा करीनाचे पुस्तक प्रेग्नेन्सी बायबलच्या मागच्या पानावर लहान मुलाच्या फोटोखाली जहांगीर लिहिलेले आढळून आले. यावरून लहान मुलाचे नाव जहाँगीर असल्याची चर्चा सुरु झाली.

बातम्या आणखी आहेत...