आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

निष्काळजीपणा:मास्क न घातल्याने ट्रोल झाला सैफ अली खान, पत्नी आणि मुलासोबत मरीन ड्राइववर दिसला फिरताना

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सैफ अतिशय निष्काळजीपणे वागला, असे नेटकरी म्हणत आहेत.
Advertisement
Advertisement

जवळजवळ अडीच महिन्यांनंतर लॉकडाऊन आता हळूहळू अनलॉक करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरु केली आहे. या अनलॉकमुळे आता लोक बाहेर फिरताना दिसत आहेत. यात बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील मागे नाहीत. अलीकडेच अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर त्यांचा मुलगा तैमूरसोबत मुंबईतील मरीन ड्राइववर फेरफटका मारताना दिसले.  मात्र या आउटिंगच्या वेळी मास्क न वापरल्याने सैफला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. 

अलीकडेच पापाराझी वीरल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सैफ, करीना आणि तैमूरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तैमूर वडिलांच्या खांद्यावर बसून सूर्यास्ताचा आनंद घेत आहे. समोर आलेल्या काही छायाचित्रांमध्ये तैमूर आणि सैफ मास्क न घातलेले दिसत आहेत.

सैफचा असा निष्काळजीपणाचा दृष्टीकोन पाहून एका यूजरने व्हिडीओवर भाष्य केले की, 'सेलिब्रिटींसाठी सनग्लासेस मास्कपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत, तेही अशा शहरात जेथे कोरोनाचे रुग्ण अधिक आहेत.' आणखी एका नेटक-याने लिहिले, 'आश्चर्याची गोष्ट आहे की, सैफसारखा सुशिक्षित आणि संवेदनशील माणूस इतक्या बेजबाबदारपणे वागू शकतो.' 

एका नेटक-याने लिहिले की, 'या लोकांना पाहून मुंबई कोविड फ्री असल्याचे दिसते. मुलानेदेखील मास्क घातलेला नाही.'  

  राज्य सरकारने कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी सूट दिल्यानंतर अनेक जण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. मुंबईत रविवारी दिवसभरात कोरोनामुळे 61 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा 1636 वर गेला आहे. तर 1421 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांचा आकडा 48,549 वर गेला आहे.

Advertisement
0