आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परिणीती चोप्रा बनली सायना:सायना नेहवालने बायोपिकमधील परिणीतीचा फर्स्ट लूक केला शेअर, म्हणाली - 'माझी लूक अ लाइक बघा'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • परिणीती पूर्वी श्रद्धा कपूर साकारणार होती भूमिका

प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा सायनाची भूमिका साकारत आहे. नुकताच सायनाने बायोपिकमधील परिणीताचा फर्स्ट लूक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये परिणीती हुबेहुब सायनासारखी दिसत आहे. सायनाने परिणीतीच्या लूकचा फोटो शेअर करुन ट्वटि केले, 'माझी लूक अ लाइक बघा.'

परिणीती पूर्वी श्रद्धा कपूर साकारणार होती भूमिका
मागील वर्षी या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. परिणीतीने बॅडमिंटनपटूची भूमिका साकारण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. परिणीतीपूर्वी ही भूमिका श्रद्धा कपूर साकारणार होती. मात्र काही कारणास्तव तिच्या जागी परिणीती वर्णी या चित्रपटात लागली. चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना देखील सायनाने एक फोटो शेअर करुन चित्रपटाच्या टीमला आपल्या शुभेच्छा देऊन या प्रवासात मी तुमच्यासोबत असल्याचे म्हटले होते.