आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप कुमार-सायरा बानो लव्ह स्टोरी:सायरा यांनी सांगितली होती आपली प्रेमकहाणी - 'वयाच्या 12 व्या वर्षीच मिसेस दिलीप कुमार व्हायचे स्वप्न पाहिले होते, त्यांच्या बंगल्याशेजारीच घर घेतले होते'

एका वर्षापूर्वीलेखक: अमित कर्ण
  • कॉपी लिंक

दिलीप कुमार यांनी 1966 मध्ये सायरा बानो यांच्याशी लग्न केले होते. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचे लग्न झाले तेव्हा सायरा बानो 22 आणि दिलीप साहेब 44 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या लग्नाची बातमी ऐकण्यासाठी प्रत्येकजण वाट पाहत होता, परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेले दिलीप साहेब वयाच्या 44 व्या वर्षी बोहल्यावर चढू शकले. काळानुसार यांचे प्रेम अधिकाधिक घट्ट होत गेले. सर्वांसमोर हे दोघे हातात हातात घालून यायचे तेव्हा लोकांची या जोडीवरुन नजर हटत नसे. आज या दोघांची 56 वर्षांची साथ अखेर तुटली.

गेल्या वर्षी सायरा बानो यांनी स्वत: दैनिक भास्करबरोबर त्यांची प्रेमकथा शेअर केली होती, ज्यात त्यांनी दिलीप साहेबांसोबतच्या नातांबद्दल त्यांनी सांगितले होते. येथे त्यांच्या संभाषणातील निवडलेले काही अंश वाचा त्यांच्याच शब्दांत...

'कायनात ने उन्हें मुझे तोहफे में सौंपा है'
'दिलीप साहेबांच्या आयुष्यात मी कसे आले, हे सर्वांनाच ठाऊक आहे. या ब्रह्मांडाने त्यांना मला भेट म्हणून दिले आहे. मला माझ्या शालेय जीवनापासूनच दिलीप कुमार यांची आयुष्याची जोडीदार व्हायचे होते. मी लहान असताना लंडनमध्ये शिकत होते आणि तेव्हापासूनच माझा दिलीप कुमार यांच्यावर जीव जडला होता. तेव्हाच एकेदिवशी मी दिलीप साहेबांची पत्नी बनेल, असे मनाशी ठरवले होते. माझ्या आईने मला सांगितले होते की, तुला मिसेज दिलीप कुमार होण्यासाठी त्यांच्यासारखेच काही करावे लागेल. त्यामुळे हे सर्व शिकण्यासाठी मी लंडनवरून माझ्या आईकडे कवितांच्या माध्यमातून पत्र-व्यवहार करत होते. भारतात परत आल्यानंतर मला समजले की, दिलीप साहेब यांना सितार खूप आवडते आणि त्यामुळे मीसुद्धा सितार शिकू लागले. यासोबत दिलीप साहेब उर्दू भाषेत तज्ज्ञ असल्यामुळे मीही उर्दू शिकणे सुरु केले.'

'माझ्या आईने माझे करिअर सुरु झाल्यानंतर माझ्यासाठी घर घेण्याचा विचार केला तेव्हा तिने दिलीप साहेबांच्या घराजवळचेच एक ठिकाण माझ्या घरासाठी निवडले. त्यांच्या घरासमोरच माझे घर बांधण्यात आले. हे घर त्यांच्या बंगल्यापासून केवळ दोन बंगल्यांच्या अंतरावर होते. असे म्हणतात ना, ‘तेरे दर के सामने एक घर बनाऊंगा’। त्या काळात मी 'मेरे प्यार मोहब्बत' ची शूटिंग करत होते.

23 ऑगस्ट 1966 रोजी माझा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी माझ्या आईनेही त्या घराची हाऊस वार्मिंग पार्टी आयोजित केली होती. मी फिल्मिस्तान स्टुडिओमधून शुटिंग करून घरी परतले तेव्हा तेथे पार्टीत माझे को-स्टार्स, डायरेक्टर जमलेले होते. यासोबतच मला अचानक त्या सर्वांमध्ये स्वतः दिलीप साहेब आलेले दिसले. माझ्या आईने त्यांना खास आमंत्रित केले होते आणि या निमित्ताने ते माझ्या पार्टीत खास मद्राहसहून सूट-बूट परिधान करुन हँडसम बनून आले होते. माझ्यासाठी तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट भेट होती.

'त्या रात्री त्यांनी पहिल्यांदा मला नोटीस केले'
'त्यांनी मला प्रपोज करण्याचाही एक रंजक किस्सा आहे. त्या काळात दिलीप साहेब माझ्याबरोबर काम करत नव्हते, कारण त्यांना वाटत होते की ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि मी त्यांच्यासोबत खूप लहान दिसेल. आमच्या दोन्ही कुटुंबियांचे जवळचे संबंध होते आणि या गोष्टीमुळे ते खूप कॉन्शियस होते की, मी या छोट्याशा मुलीला माझ्या डोळ्यांसमोर मोठे होताना पाहिले आहे आणि मी हिच्यासोबत हीरोचे काम कसे करू.'

'राम और श्याम या चित्रपटासाठी त्यांच्या नायिकेची ऑफर माझ्याकडे आली, पण दिलीप साहेब यांनी याच संकोचमुळे ती भूमिका नाकारली होती. यामुळे मी वरती ज्या पार्टीचा उल्लेख केला त्या पार्टीला मला पाहून त्यांचा विचार बदलला. त्या पार्टीत मी नीच तयार होऊन गेले होते. मी साडी परिधान केली होती, त्यामुळे वयाने मोठी वाटत होते. त्यांनी मला निरक्षणपूर्वक पाहिले आणि माझ्याशी हात मिळवताना म्हणाले की, तुम्ही तर आता एका लव्हली वुमनमध्ये बदलला आहात. त्या रात्री पहिल्यांदा त्यांनी मला नोटीस केले. त्याच्या

'आठ दिवस चालू होता रोमान्स'
ते मद्रासहून येत होते आणि आमच्याकडेच डिनर करून शूटिंगसाठी जात होते. त्यानंतर आठ दिवस हा रोमान्स चालू होता. या आठ दिवसांनी त्यांनी मला प्रपोज केले. माझ्या आई आणि आजीकडे जाऊन त्यांनी मला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर मी लगेच होकार दिला. ज्या गोष्टीची मी वयाच्या 12 व्या वर्षापासून वाट बघत होते, तो क्षण माझ्या आयुष्यात आला होता. ही ईश्वराची माझ्यावर झालेली कृपी आहे. मी त्यांच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाले होते की, लंडनमध्ये शिकत असताना अक्षरशः त्यांची स्वप्न मला पडायची.'

बातम्या आणखी आहेत...