आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थ अपडेट:सायरा बानो यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, कौटुंबिक मित्र फैजल फारुकींने सांगितले- आता त्या ठीक असून घरी विश्रांती घेत आहेत

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्या आता रुग्णालयातून घरी आल्या आहेत. ही माहिती त्यांचे जवळचे कौटुंबिक मित्र फैसल फारुकी यांनी रविवारी दिली. 77 वर्षीय सायरा बानो यांना 28 ऑगस्ट रोजी श्वसनाचा त्रास, उच्च रक्तदाब आणि उच्च साखरेमुळे खारच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती पाहता काही दिवस त्यांना आयसीयूमध्येही ठेवण्यात आले होते.

फैसल फारुकी यांनी एका न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, "सायराजी आता ठीक आहेत. त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या त्या घरी विश्रांती घेत आहेत. तुमच्या प्रार्थनांसाठी सर्वांचे आभार." गुरुवारी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले होते की, सायरा बानो यांना हृदयाची समस्या एक्यूट कोरोनरी सिंड्रोम आहे. डॉक्टरांनी त्यांना अँजिओग्राफीचा सल्लाही दिला होता.

दिलीप कुमार यांचे 7 जुलै रोजी झाले निधन
सायरा बानो यांचे पती आणि स्क्रीन आयकॉन दिलीप कुमार यांचे 7 जुलै रोजी वयाच्या 98 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. तेव्हापासून सायरा एकट्या पडल्या आहेत. दिलीप आणि सायरा यांनी 'सगीना' आणि 'गोपी' यासह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले, त्यांनी 1966 मध्ये लग्न केले होते.

बातम्या आणखी आहेत...