आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायरा बानोंना अश्रू अनावर:सायरा बानो यांची दिलीप साहेबांना भारतरत्न देण्याची मागणी, म्हणाल्या - ते भारताचे कोहिनूर होते

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिलीप कुमार यांचे 7 जुलै 2021 रोजी झाले होते निधन

बाॅलिवूडचे दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांना 'भारतरत्न डॉक्टर आंबेडकर' पुरस्काराने सन्मानित केले गेले. मंगळवारी एका कार्यक्रमात हा मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या पत्नी सायरा बानो खूप भावूक झाल्या होत्या. कार्यक्रमातील सायरा यांचे काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात त्यांन दिलीप साहेबांच्या आठवणीत अश्रू अनावर झालेले दिसत आहेत. सायरा म्हणाल्या की, ते अजूनही त्याच्यासोबत आहे. सोबतच त्यांनी दिलीप साहेबांचे कोहिनूर असे वर्णन करून त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली.

पुरस्कार स्वीकारताना सायरा यांना अश्रू अनावर
पापाराझी अकाउंटवरुनव शेअर झालेल्या व्हिडिओमध्ये सायरा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना दिसत आहेत. यानंतर रामदास आठवले दिलीप कुमार यांच्याबद्दल बोलताच सायरा यांना अश्रू अनावर झाले. सायरा म्हणाल्या की, यामुळेच त्यांना कोणत्याही कार्यक्रमात येणे आवडत नाही, कारण कार्यक्रमांमध्ये दिलीप साहेबांच्या आठवणीने त्या भावूक होतात.

दिलीप साहेबांना म्हटले भारताचा 'कोहिनूर'
या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सायरा म्हणाल्या, "दिलीप साहेब भारताचे कोहिनूर होते आणि त्यांना भारतरत्न मिळायलाच हवे. ते आतादेखील माझ्यासोबत इथे आहेत. माझ्या आठवणीत नाहीत तर माझ्या प्रत्येक पावलावर ते माझ्यासोबत आहेत. कारण असाच विचार करून मी माझे आयुष्य जगत आहे. माझा सदैव आधार बनून ते माझ्या पाठीशी आहेत. माझा कोहिनूर," अशा शब्दांत सायरा यावेळी व्यक्त झाल्या.

दिलीप कुमार यांचे 7 जुलै 2021 रोजी झाले होते निधन
दिलीप कुमार यांना नुकतेच 'भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कार'साठी नामांकन मिळाले होते. सायरा त्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईत एका कार्यक्रमात पोहोचल्या होत्या. दिलीप कुमार यांचे 7 जुलै 2021 रोजी वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. ते दीर्घकाळ आजाराशी झुंज देत होते.

बातम्या आणखी आहेत...