आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनयापासून दुरावल्या अभिनेत्री:लग्न थाटून सायरा बानोंनी सोडली होती फिल्म इंडस्ट्री, या अभिनेत्रींनीही लग्नानंतर ठोकला रामराम

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घेऊया कोणकोण आहेत या अभिनेत्री

आजच्या काळातील अभिनेत्री लग्नानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच व्यावसायिक आयुष्य देखील सांभाळतात. पण काही अभिनेत्री अशा आहेत ज्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी सिनेसृष्टीपासून कायमच्या दुरावल्या. चला तर मग आज अशाच अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया ज्यांनी लग्नानंतर सिनेसृष्टीला रामराम ठोकला.

सायरा बानो

सायरा बानो त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होत्या. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. सायरा बानो पडोसन, जंगली, पूरब और पश्चिम यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये दिसल्या आहेत. पण जेव्हा सायरा यांची कारकीर्द यशोशिखरावर होती. तेव्हा त्यांनी दिलीप कुमार यांच्याशी लग्न केले. 1966 मध्ये दिलीप कुमार यांच्याशी लग्न झाले तेव्हा सायरा फक्त 22 वर्षांची होत्या. पण त्यांनी दिलीप यांच्यासाठी आपले करिअर सोडून त्यांची काळजी घेतली. लग्नापूर्वी सायरा यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट होते जे त्यांनी लग्नानंतर सोडले होते.

बबिता

बबिता या 70 च्या दशकातील खूप लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी राज, कल आज और कल, हसीना मान जायेगी यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण लग्नानंतर त्यांनी वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करत चित्रपटांपासून फारकत घेतली. त्यांनी सुमारे 19 चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले, त्यानंतर वयाच्या 23 व्या वर्षी 6 नोव्हेंबर 1971 रोजी रणधीर कपूर यांच्याशी लग्न केले. मात्र, लग्नानंतर काही वर्षांनी करिश्मा आणि करिनाला घेऊन बबिता रणधीरपासून विभक्त झाल्या होत्या. दोघे जवळपास 20 वर्षे एकमेकांपासून दूर राहिले, पण नंतर दोघे पुन्हा एकत्र आले. बबिता यांनी आपल्या कुटुंबासाठी फिल्मी करिअरवर पाणी सोडले.

मीनाक्षी शेषाद्री​​​​​​​​​​​​​​

मीनाक्षी 80 च्या दशकातील दिवा म्हणून ओळखली जात होती. घायाळ, दामिनी यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटात तिने काम केले आहे. ती केवळ तिच्या सौंदर्यासाठीच नाही तर तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठीही ओळखली जाते. घातक या चित्रपटात ती शेवटची दिसली होती त्यानंतर तिने कोणताही चित्रपट केला नाही. राजकुमार संतोषी यांच्या बहुतेक चित्रपटात मीनाक्षी असायची, एके दिवशी संतोषी यांनी मीनाक्षीला प्रपोज केले. त्यानंतर मीनाक्षीने त्यांना नकार दिला आणि फिल्म इंडस्ट्री सोडली. 1995 मध्ये तिने बँकर हरीश म्हैसूरसोबत लग्न केले. लग्नानंतर मीनाक्षीने बॉलिवूडला रामरामर ठोकला. दोघांना दोन मुले आहेत. मीनाक्षी एक उत्कृष्ट शास्त्रीय नृत्यांगना आहे आणि सध्या ती टेक्सासमध्ये स्वतःचे डान्स क्लास चालवते.

भाग्यश्री

​​​

भाग्यश्री 90 च्या दशकातील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. भाग्यश्रीने सलमान खानसोबत 'मैने प्यार किया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामुळे तिची फॅन फॉलोइंग खूप वाढली आणि प्रत्येक निर्मात्याला तिच्यासोबत चित्रपट बनवायचा होता, तिची सुमन ही व्यक्तिरेखा 90 च्या दशकातील तरुणींची आयडॉल बनली होती. पण 'मैने प्यार किया'नंतर लग्नगाठ बांधत भाग्यश्रीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. खरं तर, वयाच्या 19 व्या वर्षी तिने 1990 मध्ये अभिनेता हिमालय दासानीशी लग्न केले. लग्नानंतर, तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे, भाग्यश्रीने स्वतःला चित्रपटांपासून दूर केले आणि त्यानंतर फारच क्वचित चित्रपटांमध्ये ती झळकली.

मंदाकिनी​​​​​​​​​​​​​​

'राम तेरी गंगा मैली' हा चित्रपट आठवतोय का? या चित्रपटात मंदाकिनीच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मंदाकिनीचे नाव दाऊद इब्राहिमशी देखील जोडले गेले होते. 1990 मध्ये तिने डॉ. काग्युर टी. रिनपोचे ठाकूर यांच्याशी लग्न केले आणि ती बौद्ध भिक्षू बनली. लग्नानंतर मंदाकिनी वैयक्तिक आयुष्यामुळे बॉलिवूडपासून दुरावली. आता मंदाकिनी आणि तिचे पती मुंबईत तिबेट हर्बल सेंटर चालवतात. याशिवाय मंदाकिनी योगाही शिकवते. दोघांना दोन मुले आहेत.

नम्रता शिरोडकर​​​​​​​​​​​​​​

माजी मिस इंडिया नम्रता शिरोडकर एलओसी कारगिल, अस्तित्व यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिने 1993 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला होता. दरम्यान, 2000 मध्ये 'वामसी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिची भेट अभिनेता महेश बाबूशी झाली. दोघांनी एकमेकांना 5 वर्षे डेट केले आणि 2005 मध्ये लग्न थाटले. लग्नानंतर नम्रताने बॉलिवूड सोडले आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. सध्या दोघांना दोन मुले असून नम्रता आपल्या मुलांचा सांभाळ करण्यात व्यस्त आहे.

ट्विंकल खन्ना

ट्विंकल खन्ना ही एक अशी अभिनेत्री आहे जिने बॉलिवूडच्या तिन्ही खान मंडळींसोबत स्क्रीन शेअर केली आहे. तिचा शेवटचा चित्रपट 'लव के लिए कुछ भी करेगा' होता, त्यानंतर तिने 2001 मध्ये अक्षय कुमारशी लग्न केले आणि बॉलिवूडला रामराम ठोकला. लग्नानंतर ट्विंकलने आपल्या कुटुंबाला वेळ देणे जास्त महत्त्वाचे मानले आणि ती सिनेसृष्टीपासून दुरावली.

असीन थोट्टुमकल​​​​​​​​​​​​​​

'गजनी' फेम असीनचा चेहरा आठवतोय का? या चित्रपटामुळे असिन लोकप्रिय झाली पण तिची फिल्मी कारकीर्द फार काळ टिकली नाही आणि तिने 2016 मध्ये मायक्रोमॅक्सचे सीईओ राहुल शर्मासोबत लग्न थाटले. लग्नानंतर असिनने फिल्मी दुनियेला रामराम ठोकला आहे. सध्या तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...