आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थ अपडेट:सायरा बानो म्हणाल्या - साहेबांची प्रकृती स्थिर असून ते 2-3 दिवसांत घरी परततील, फॉरवर्ड करण्यात येणा-या मेसेजवर विश्वास ठेऊ नका

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिलीप कुमार यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरु लागल्या आहेत.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी (6 जून) मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, त्यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरु लागल्या आहेत. दरम्यान या अफवांवर त्यांची पत्नी सायरा बानो यांनी एक पोस्ट शेअर करत दिलीप कुमार यांच्या तब्येतीविषयी अपडेट दिले आहे. दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असून ते 2-3 दिवसांत घरी परततील असे त्यांनी सांगितले आहे.

फॉरवर्ड करण्यात येणा-या मेसेजवर विश्वास ठेऊ नका
पोस्ट शेअर करताना सायरा बानो यांनी लिहिले, 'सोशल मीडियावरील मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. साहेबांची प्रकृती स्थिर आहे. मनापासून केलेल्या तुमच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ते 2-3 दिवसांत घरी परततील,' असे त्या म्हणाल्या आहेत.

यापूर्वीही सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. त्यात लिहिले होते, ‘दिलीप साहेब यांची प्रकृती थोडी बिघडली होती. त्यामुळे आम्ही खार येथील हिंदुजा रुग्णालयात त्यांना घेऊन गेलो. हे एक नॉन कोविड रुग्णालय आहे. येथे आम्ही चेकअप करण्यासाठी आलो होतो. तसेच दिलीप कुमार यांची प्रकृती का बघडली आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. डॉ. नितिन गोखले यांची टीम त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेून आहे. दिलीप साहेबांसाठी प्रार्थना करा आणि सुरक्षित राहा.’

दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसात पाणी जमा झाले - डॉक्टर
दैनिक भास्करसोबत बोलताना रुग्णालयातील डॉ. जलील पारकर यांनी सांगितले होते, 'दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसात पाणी जमा झाले आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले आहे. त्यांची ऑक्सिजनची पातळीदेखील वर-खाली जात आहे. मात्र ते व्हेंटिलेटर किंवा आयसीयूत नाहीत. वयोमानामुळे त्यांना हा त्रास झाला आहे.'

मागील महिन्यातही रुग्णालयात झाले होते दाखल

यापूर्वी मे महिन्यात दिलीप कुमार यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण नेहमीच्या काही चाचण्या करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सायरा बानो यांनी सांगितले होते. ‘आम्ही रुग्णालयात केवळ रुटिन चेकअप करण्यासाठी आलो आहोत,’ असे सायरा बानो म्हणाल्या होत्या.

कोरोनामुळे दोन भावांचे निधन

मागील वर्षी दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांचा कोरोनामुळे निधन झाले होते. 21 ऑगस्ट रोजी 88 वर्षीय अस्लम यांचे तर 2 सप्टेंबर रोजी 90 वर्षीय अहसान यांची कोरोनामुळे प्राणज्योत मालवली होती. यामुळे सायरा बानो आणि दिलीप कुमार यांनी 11 ऑक्टोबर रोजी आपल्या लग्नाचा 54 वा वाढदिवस साजरा केला नव्हता.

दिलीप कुमार पद्मभूषण, दादासाहेब पुरस्काराने सन्मानित

दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान आहे. त्यांनी 'ज्वार भाटा' (1944), 'अंदाज' (1949), 'आन' (1952), 'देवदास' (1955), 'आझाद' (1955), 'मुगल-ए-आजम' (1960), 'गंगा' जमुना (1961), 'क्रांती' (1981), 'कर्मा' (1986) आणि 'सौदागर' (1991) यासह 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

फिल्मफेअरचे 1954 चे उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळवणारे दिलीप कुमार हे पहिले अभिनेते आहेत. त्यांना आठ वेळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1991 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल 1994 ला दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन दिलीप कुमार यांना गौरवण्यात आले आहे. राष्ट्रपती कोट्यातून 2000-2006 दरम्यान त्यांना राज्यसभेचे सभासदत्व देण्यात आले होते. पाकिस्तान सरकारने 1998 मध्ये त्यांना ‘निशान-ए-इम्तियाझ’ हा पाकिस्तानमधील सर्वात उच्च असे नागरी पारितोषिक देऊन सन्मानित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...