आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिलांसोबत दिसणाऱ्या या बहीणभावाला ओळखलंत का!:दोघेही बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक, एकाचे वादाशी जवळचे नाते

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड सेलिब्रिटींचे आयुष्य कुणापासूनही लपलेले नाही. अभिनेता असो वा अभिनेत्री किंवा अगदी स्टारकिड्स... त्यांच्या चित्रपट, ब्रेकअप आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित बातम्या काही मिनिटांत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान, दोन मुलांचा त्यांच्या आईवडिलांसोबतचा एक फोटो व्हायरल होतोय. पण हे दोन चिमुकले आता नेमके कोण आहेत, हे चाहत्यांना ओळखणे कठीण झाले आहे. या दोन्ही मुलांच्या नावाचा समावेश आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकांमध्ये होतो. बहीण एक प्रसिद्ध कोरिओग्राफर देखील आहे आणि आता चित्रपटांचे दिग्दर्शन करते. वरील छायाचित्रात दिसणाऱ्या या चिमुकल्यांची नावे आहेत साजिद खान आणि फराह खान. साजिद आणि फराह इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नावे आहेत.

साजिद आणि फराह खानच्या आई-वडिलांबद्दल फार लोकांना माहिती नाही. पण साजिद खानने 'बिग बॉस 16'मध्ये एकदा खुलासा केला होता की, त्याचे बालपण प्रचंड गरिबीत गेले होते. त्याच्या कुटुंबाकडे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते. त्यावेळी सलमान खानचे वडील सलीम खान यांनी त्यांना मदत केली होती. साजिदचे वडील कामरान खान हे एकेकाळी सर्वात मोठ्या चित्रपट निर्मात्यांपैकी एक होते. पण अपयशामुळे त्यांनी दारु पिण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे त्यांचे लिव्हर खराब झाले. साजिद 14 वर्षांचा असताना त्याने आपल्या वडिलांना गमावले होते.

साजिद अभ्यासात फारसा चांगला नव्हता आणि दहावीत तीन वेळा नापास झाला होते. मात्र, त्याने हार मानली नाही आणि दिग्दर्शक होण्याचे स्वप्न पूर्ण केले. बॉलिवूड अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्याने केले आहे. मात्र वादांशी त्यांचे जवळचे नाते आहे. यामुळे त्याला काँट्रोवर्सी किंग असे देखील म्हटले जाते.

साजिद खान MeToo मुळे वादात सापडला. शर्लिन चोप्रा, प्रियांका बोस, आहाना कुमरा यांसारख्या अनेक अभिनेत्री, फिल्ममेकर आणि मॉडेल्सनी त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. साजिदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तो सध्या बिग बॉस 16 मध्ये दिसत आहे. मात्र, मीटूमुळे तो शोमध्ये ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला.

दुसरीकडे, फराह खानबद्दल सांगायचे तर, तिने कोरिओग्राफर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. प्रसिद्ध गाणे 'पेहला नशा पेहला खुमार' हे गाणे फराहनेच कोरिओग्राफ केले होते. त्यानंतर अनेक चित्रपटांसाठी तिने कोरिओग्राफी केली. फराहने 'मै हुं ना' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कॅटेगरीमध्ये नामांकन मिळाले होते.

फराहने शिरीष कुंदरसोबत लग्न केले आहे. 'मै हुं ना' या चित्रपटाच्या सेटवरच फराहची ओळख शिरीषसोबत झाली होती. शिरीष या चित्रपटाचा एडिटर म्हणून काम करत होता.

शिरीष आणि फराह या दोघांनी मिळून स्वतःशी एक प्रोडक्शन कंपनी देखील चालू केली आहे. थ्रीज कंपनी असे त्यांच्या या कंपनीचे नाव आहे. त्यांना तिळी मुले आहेत. या मुलांवरूनच त्यांनी या कंपनीचे नाव थ्रीज कंपनी असे ठेवले आहे.

वयाच्या 43 व्या वर्षी आयव्हीएफ या टेक्नॉलॉजीजद्वारे ती 3 मुलांची आई झालेली आहे. एक मुलगा आणि दोन मुली तिला आहेत. मुलाचे नाव आहे झार तर मुलीचे नाव आहे दिव्या आणि अन्या आहे. फराह सध्या कतारमध्ये आपल्या मुलांसोबत सुटी एन्जॉय करतेय.

बातम्या आणखी आहेत...