आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

48 वर्षांची झाली टीव्हीची 'पार्वती':एकेकाळी 900 रुपये पगारावर नोकरी करायची साक्षी, 'दंगल'मध्ये मल्लिका शेरावतला रिजेक्ट करत आमिरने खानने दिला होता पत्नीचा रोल

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'दंगल' या चित्रपटात साक्षीने आमिरची पत्नी दया कौरची भूमिका साकारली होती.

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री साक्षी तन्वर हिने वयाची 48 वर्षे पूर्ण केली आहेत. 12 जानेवारी 1973 रोजी राजस्थानच्या अलवर येथे साक्षीचा जन्म झाला होता. 2000 मध्ये आलेल्या कहानी घर घर की या मालिकेतील पार्वतीच्या भूमिकेतून साक्षी घराघरांत पोहोचली होती. ही मालिका 2008 पर्यंत छोट्या पडद्यावर सुरु होती. साक्षीच्या 48 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी -

अलवर येथे झाला जन्म
साक्षीचा जन्म अलवर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिचे वडील राजेेंद्र सिंह तोमर रिटायर्ड सीबीआई ऑफिसर आहेत. अलवर येथील केंद्रीय विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर साक्षीने दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.

साक्षीला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायरचे होते. मात्र एंट्रन्स परीक्षेत अपयश आल्यानंतर तिने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. अभिनयात येण्यापूर्वी साक्षी दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेस येथे सेल्स ट्रेनी म्हणून नोकरी करत होती. याशिवाय तिने एका क्लोदिंग आणि एक्सेसरी कंपनीतही काम केले. येथे तिला 900 रुपये स्टायपंड मिळायचा.

अँकरिंगद्वारे केली करिअरची सुरुवात
साक्षीने तिच्या करिअरची सुरुवात दुरदर्शवर प्रसारित झालेल्या 'अलबेला सुर मेला' या सांगितिक कार्यक्रमाच्या अँकरिंगच्या रुपात केली होती. यासाठी साक्षीने ऑडिशन दिली होती. त्यानंतर 1996 मध्ये टीव्ही शो 'दस्तूर'द्वारे तिने स्मॉल स्क्रिनवर एन्ट्री घेतली होती. तिला खरी लोकप्रियता मिळाली ती एकता कपूरच्या 'कहानी घर घर की' या मालिकेतून. पुढे तिने 'देवी', 'बालिका वधू', 'क्राइम पेट्रोल', 'बडे अच्छे लगते है' या मालिकांमध्ये झळकली.

अशी मिळाली होती दंगलमधील भूमिका
साक्षीने फक्त टेलिव्हिजनवरच नव्हे तर मोठ्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आपल्या करिअरमध्ये साक्षीने ब-याच सिनेमांमध्ये काम केले. 'कॉफी हाउस', 'बावरा मन', 'सलून', 'कहीं दूर', 'मौहल्ला अस्सी' आणि 'दंगल' या सिनेमांमध्ये ती झळकली आहे. 2017 मध्ये आलेल्या 'दंगल' या चित्रपटात तिने आमिरची पत्नी दया कौरची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी अभिनेत्री मल्लिका शेरावत हिनेदेखील ऑडिशन दिली होती. मात्र ही भूमिका साक्षीच्या वाट्याला आली. आमिरच्या आईला साक्षी आवडते. आमिरच्या आई साक्षीची मुख्य भूमिका असलेली 'बडे अच्छे लगते है' ही मालिका कायम बघायच्या. त्यांनीच आमिरला साक्षीचे नाव सुचवले होते.

बातम्या आणखी आहेत...