आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. पण यानंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा मुद्दा उफाळून आला आहे. करण जोहरने इंडस्ट्रीत लॉबी निर्माण केली आहे, असा आरोप त्याच्यावर करण्यात येतोय. तर त्यातच दिग्दर्शक अभिनव कश्यपने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून सलमान खानवर धक्कादायक आरोप केले आहेत.
बॉलिवूडमधील घराणेशाहीने माझे शोषण केले. ‘दबंग’सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यानंतरही माझी आज ही अवस्था आहे. अरबाज खानला चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे होते म्हणून माझ्याकडून ‘दबंग 2’ काढून घेण्यात आला. याविरोधात मी आवाज उठवला. म्हणून त्यांनी इतर प्रोजेक्टही माझ्याकडून काढून घेतले. शिवाय मला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशीही धमकी दिली, असा आरोप अभिनवने सलमान आणि त्याच्या कुटुंबावर लावला आहे.
अभिनवच्या या आरोपांवर खान कुटुंबीय प्रतिक्रिया देऊ इच्छि नव्हते. मात्र आता या प्रकरणावर सलमानचे वडील सलीम खान यांनी भास्करला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनवने सलमान खानसोबत काम करण्यास नकार दिला होता
सलीम खान म्हणाले, 'हे निरुपयोगी लोक आहेत. या लोकांकडे दुसरे कोणतेही काम नाही. हे काहीही उलटं सुलटं बोलतील आणि त्यावर आम्ही प्रतिक्रिया द्यावी, हेच यांना हवं असतं. माझी करिअला 50 वर्षे झाली आहेत. हे कालचे आलेले प्रश्न विचारतात. एकच चित्रपट बनवला आणि दुसरा ऑफर केला तर त्याला नकार दिला. यानंतर यांच्यासोबत जे काही घडले त्याला आम्ही जबाबदार आहोत का? हे शक्य आहे का?', असा प्रश्न सलीम खान यांनी विचारला.
राज साहेब आणि दिलीप साहेबांनीही संघर्ष केला होता : सलीम खान
सुशांतसिंग राजपूतच्या निधनापासून इंडस्ट्रीबाहेरील लोकांना येथे कमी संधी मिळते, त्यामुळे त्यांना मानसिक दबावातून जावे लागत आहे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. इनसाइडरला इंडस्ट्रीत सहज संधी मिळते, असे कायमच म्हटले गेले आहे. यावर सलीम खान यांनी उत्तर दिले की, 'ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये टॅलेंटशिवाय काहीही चालत नाही. आतील आणि बाहेरील व्यक्ती असं इथे काहीही नाही. फक्त हुशार असणे आवश्यक आहे. आणि हे जे म्हटले जात की आऊटसाइडरला जास्त संघर्ष करावा लागतो, तो तर राज साहेब आणि दिलीप साहेबांनाही करावा लागला होता.'
खरं सांगायचं तर या सर्व मुद्द्यांवर मला काही बोलायचं नाही, कारण त्यांच्या या उत्तरादाखल आम्ही काही तरी प्रतिक्रिया द्यावी आणि त्यावरुन खरा खोटा वादविवाद निर्माण व्हावा, हेच या लोकांना हवे आहे. हे खरंच आश्चर्यकारक आहे. या लोकांच्या जर हातात असेल तर जगात जे काही चालले आहे, ते सलमानमुळेच आहे, असा आरोप करायलाही मागेपुढे बघणार नाहीत, असे सलीम खान म्हणाले.
सलीम खान अभिनवला कधीच भेटले नाहीत
अभिनव कश्यपला 'दबंग'च्या शूटिंग दरम्यान कधी भेटला होता का? असा प्रश्न सलीम खान यांना विचारला असता, त्यांनी नाही असे उत्तर दिले. अभिनव जे काही बोलतोय ती त्याची स्वतःची कल्पनाशक्ती आहे, असे ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.