आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानला जीवे मारण्याची धमकी:मुंबई गुन्हे शाखेचे पथक गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये दाखल, 'तुमचा सिद्धू मुसेवाला करु' अशा आशयाचे मिळाले पत्र

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 5 जून रोजी सलमान आणि सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते.

अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. धमकी मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या गृह विभागाने कारवाई केली आहे. सलमान आणि त्याच्या वडिलांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान मुंबई क्राइम ब्रँचचे एक पथक सोमवारी सलमानच्या घरी 'गॅलेक्सी अपार्टमेंट' पोहोचले.

सलमान आणि सलीम खान यांना मिळालेल्या धमकीच्या पत्राचा फोटो.
सलमान आणि सलीम खान यांना मिळालेल्या धमकीच्या पत्राचा फोटो.

एक दिवस आधी म्हणजेच 5 जून रोजी सलमान आणि सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. सलीम खान वांद्र्याच्या बॅंडस्टँड प्रोमेनेडमध्ये मॉर्निंग वॉकनंतर ज्या ठिकाणी बसतात तिथे त्यांना हे धमकीचे पत्र मिळाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान आणि सलीम खान यांना पत्रात धमकी देण्यात आली आहे की, "तुमचा मुसेवाला करु", असा आशय या पत्रात आहे. पत्रात G.B आणि L.B असेही नमूद केले गेले आहे. पोलिसांच्या मते सलमानला ही धमकी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून देण्यात आली आहे.

आरोपींचा शोध घेण्यासाठी बँड स्टँड परिसरातील सीसीटीव्ही कॅमरे चेक केले जात आहेत. घटनेमागे नेमके कोण आहे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे.

सलमान खान अलीकडेच अबुधाबीच्या यास बेटावर आयफा 2022 चा होस्ट म्हणून पोहोचला होता.
सलमान खान अलीकडेच अबुधाबीच्या यास बेटावर आयफा 2022 चा होस्ट म्हणून पोहोचला होता.

गेल्या काही दिवसांपासून वाढवण्यात आली सलमानची सुरक्षा
गेल्या आठवड्यात पंजाबी गायक 'सिद्धू मूसेवाला' यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई असल्याची माहिती समोर आली होती. सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

'रेडी' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानवर हल्ला करण्याचा कट लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने आखला होता. सिद्धू मूसेवाला प्रकरणी बिश्नोईचे नाव समोर आल्यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. "आम्ही सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली आहे. राजस्थानची टोळी पुन्हा सक्रीय होत असताना कोणताची अनुचित प्रकार घडू नये, यासाठी त्याच्या अपार्टमेंटच्या आसपास पोलीस हजर असतील," असे मुंबई पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

काळवीट प्रकरणी सलमानला धमकी देण्यात आली होती

लॉरेन्स बिश्नोई याने काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. बिश्नोई समाज काळवीटाला पवित्र मानतो, त्यामुळे त्याची शिकार केल्याचा आरोप असलेल्या सलमान खानला मारण्याची धमकी लॉरेन्सने दिली होती.

जोधपूरमध्ये सलमानला मारण्याचा होता कट

2008 मध्ये कोर्टाबाहेर लॉरेन्स बिश्नोईने जोधपूरमध्ये सलमान खानला मारणार असल्याचे सांगितले होते. तो असेही म्हणाला होता की, 'मी अजून काही केले नाही, पण जेव्हा मी सलमान खानला मारेन तेव्हा मग कळेल. सध्या मला अनावश्यक गोष्टींमध्ये ओढले जात आहे.

सलमान खानचे आगामी प्रोजेक्ट्स
सलमान खान नुकताच अबुधाबीच्या यास बेटावर आयफा अवॉर्ड्सचा होस्ट म्हणून गेला होता. याशिवाय तो आता 'कभी ईद कभी दिवाली'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'टायगर' मालिकेतील तिसरा चित्रपट 'टायगर 3'मध्येही तो काम करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफही दिसणार आहे. यासोबतच तो आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' आणि शाहरुख खानच्या 'पठाण'मध्येही छोट्या भूमिकेत दिसणार आहे.

लॉरेन्सचा एक व्हिडिओ सध्या होतोय व्हायरल

लॉरेन्सचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 2021मधील आहे. जेव्हा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लॉरेन्स आणि त्याच्या गँगला देशातील वेगवेगळ्या राज्यातून मकोका केसअंतर्गत ताब्यात घेतले होते. या व्हिडिओमध्ये लॉरेन्ससह त्याचा साथीदार संपत देखील दिसतो. संपत हा लॉरेन्सचा राजस्थानचा साथीदार आहे. संपतने सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर रेकी केली होती. पण पोलिसांनी त्याला तेव्हा ताब्यात घेतले होते.

बातम्या आणखी आहेत...