आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलीम खान यांचा वाढदिवस:हेलनसोबत दुसरे लग्न केल्याने पहिली पत्नी सलमा आणि मुलांना बसला होता मोठा धक्का, नंतर मात्र कुटुंबीयांचा दृष्टिकोन बदलला

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हेलन-सलीम यांच्या लग्नामुळे कुटुंबीय नव्हते खुश

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचे वडील आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध स्क्रिप्ट आणि डायलॉग रायटर सलीम खान यांचा आज (24 नोव्हेंबर) वाढदिवस असून त्यांनी वयाची 86 वर्षे पूर्ण केली आहेत. सलीम खान यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1935 रोजी इंदूर येथे झाला. त्यांचे वडील पोलिसांत होते. सलीम खान यांनी जावेद अख्तर यांच्यासोबत मिळून गाजलेल्या 'शोले' या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिली होती.

विशेष म्हणजे स्क्रिप्ट रायटर होण्यापूर्वी त्यांनी एका थ्रिलर चित्रपटात अभिनय केला होता. 1966 मध्ये आलेल्या तीसरी मंजिल या चित्रपटात ते झळकले होते. इतकेच नाही तर यात त्यांनी हेलन यांच्यासोबत काम केले होते. त्यावेळी हेलन यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले नव्हते. तर पहिले लग्न होऊन फक्त दोन वर्ष झाली होती.

हेलन-सलीम यांच्या लग्नामुळे कुटुंबीय नव्हते खुश
1964 मध्ये सलीम खान यांनी मराठी मुलगी सुशीला चरकसोबत लग्न केले. लग्नाच्या वेळी सुशीला यांनी त्यांचे नाव बदलून सलमा ठेवले. 27 डिसेंबर 1965 रोजी त्यांचा थोरला मुलगा सलमान खानचा जन्म झाला. सलीम आणि सलमा यांची एकुण चार मुले आहेत. सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान आणि अ‍लविरा ही त्यांची नावे.

1981 मध्ये सलीम खान यांनी प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री हेलेनसोबत दुसरे लग्न केले. कुटुंबीयांना न सांगता सलीम खान यांनी हेलन यांच्याशी लग्न केले होते. जेव्हा पहिल्यांदा सलीम खान लग्नानंतर हेलन यांना घरी घेऊन गेले तेव्हा त्यांची पहिली पत्नी सलमा यांनी दरवाजा उघडला होता. सलीम खान आणि हेलन यांनी लग्न केलेले पाहून त्यांना धक्काच बसला होता.

सलीम खान यांनी एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला होता. जेव्हा पहिल्यांदा लग्नानंतर हेलन यांना घरी घेऊन गेले तेव्हा कुटुंबीयांनी त्यांना स्वीकारण्यास नकार दिला होता. तसेच सलमान खानला देखील सलीम यांचा निर्णय आवडला नव्हता.

हळूहळू हेलन यांच्याकडे बघण्याचा कुटुंबीयांचा दृष्टिकोन बदलला
सलमान त्यावेळी लहान होता. हेलन यांच्याशी बोलणे वैगरे सलमानला फार आवडत नव्हते. मुले त्यांची आई कसे वागते हे पाहून वागत होते’ असे सलीम म्हणाले होते. पुढे ते म्हणाले, सुरुवातीला सलमाला माझे आणि हेलनचे नाते मान्य नव्हते. सलमाचे वागणे पाहून मुले पण तशीच वागत होती. तेव्हा घरात कुणीही हेलनशी बोलत नव्हते. सलीम आणि हेलन यांच्या लग्नामुळे सलमा यांना मोठा धक्का बसला होता. त्या नैराश्यामध्ये गेल्याचे म्हटले जाते. पण थोड्या दिवसांनंतर सर्व काही बदलले. आता सलमा, हेलन आणि सलीम खान मुलांसोबत एकत्र आनंदाने राहतात. सलीम खान यांच्या कुटुंबाकडे आता एक उदार कुटुंब म्हणून पाहिले जाते. सलमान खान आणि त्याच्या इतर भावडांकडून आई सलमा खानप्रमाणेच हेलन यांचाही आदर केला जातो. एवढंच नाही तर सलमा खान आणि हेलन यांचीही चांगली मैत्री आहे.

अर्पिताला दत्तक घेतले
हेलन आणि सलीम खान यांचे एकही अपत्य नाही. त्यामुळे त्यांनी एका मुलीला दत्तक घेतले. तिचे नाव आहे अर्पिता खान. तिन्ही भावांचे अर्पितावर जीवापाड प्रेम आहे. विशेषतः सलमानचे अर्पितासोबत खास बाँडिंग आहे.
8 नोव्हेंबर 2014 रोजी अर्पिताचे आयुष शर्मासोबत हैदराबादच्या हॉटेल फलकनुमा पॅलेसमध्ये लग्न झाले होते. मार्च 2016 मध्ये त्यांचा मुलगा आहिलचा तर 2019 मध्ये मुलगी आयतचा जन्म झाला.

बातम्या आणखी आहेत...