आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर खास:सलमानचे वडील सलीम खान यांनी केले आवाहन, म्हणाले -‘सलमान माझ्यापासून दूर आहे, तुम्हीदेखील जेथे आहात तेथेच राहा’

इंदूर (अमित कर्ण)3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनमध्ये विनाकारण घरातून निघणा-या लोकांना पाहून सलीम खान यांनी व्यक्त केली चिंता

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानदेखील मागील 14 दिवसांपासून त्याच्या पनवेल येथील फॉर्म हाऊसमध्ये अडकला आहे. त्याच्यासोबत बहीण अर्पिता, तिचे कुटुंब आणि लहान मुलेदेखील आहेत. तो त्याचे वडील सलीम खान यांच्यापासून पहिल्यांदाच दूर आहे. सलीम खान आणि सलमानने आपल्या स्टार पॉवरचा वापर न करता यावेळी दूर राहणेच योग्य आहे असा विचार केला असल्याचे त्यांनी दैनिक भास्करशी केलेल्या खास चर्चेत सांगितले.  सलीम खान म्हणाले, कोरोनाला योग्य उत्तर देण्यासाठी हे काही रॉकेट सायन्स नाही. फक्त घरातच राहून सुरक्षित राहायचे आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळायचे आहे. मीदेखील हे पाळतो आहे. सलमानदेखील करतो आहे. आयुष्यात पहिल्यांदाच माझा मुलगा माझ्यापासून 13 दिवस झाले दूर आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की, तो माझ्याशिवाय रडतोय किंवा मला खूप मिस करतोय. त्याला माहीत आहे की, ही वेळ जबाबदारीने वागण्याची आहे. दूर राहण्यातच फायदा आहे. 

  • माझी तीनही मुले समजदार आहेत

माझी तीनही मुले समजदार आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करत आहेत. भावनिक व्हायची काहीच गरज नाही. मुलगा-वडिलांपासून किंवा वडील-मुलापासून अशा प्रसंगी दूर राहणे एक दुसऱ्यांसाठी चांगलेच आहे. जर आम्ही राहू शकतो तर कृपया तुम्हीदेखील जेथे आहात तेथेच राहा. होमटाऊन इंदूरवासीयांना देखील माझे हेच सांगणे आहे की, प्रशासन देत असलेल्या सूचनांचे सक्तीने पालन करा. यात तुमचाच फायदा आहे. सलमान आता पनवेलमध्ये आहे. त्याच्याशी ऑडिओ कॉलवर बोलणे होत असते. व्हिडिओ कॉलची मला गरज वाटत नाही. लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही सर्व एकत्र येणारच आहोत. आता तर ना मी त्याच्याजवळ जाऊ शकत ना तो माझ्याजवळ येऊ शकत. आम्ही कितीही मोठे स्टार असलो तरी आम्हाला यावेळी आमच्या स्टार पॉवरचा वापर करणे योग्य वाटले नाही. पनवेलमध्ये अर्पिताची दोन छोटी मुलेही आहेत. म्हणून सलमानचे तेथे राहणे खूप गरजेचे आहे.

  • असा वेळ घालवत आहेत सलीम खान

अरबाज, सोहेल आणि माझी मुलगी माझ्या जवळच राहतात. ज्यावेळी गरज असते किंवा जेवणासाठी आणि गप्प्पा मारण्यासाठी एकत्र येतो. मला वाचनाचा छंद असल्यामुळे मी तो आता पूर्ण करत आहे. काही अभिनयाची आणि स्क्रीनप्लेची पुस्तके, साहित्यदेखील वाचतोय. अशाप्रकारे सध्या मी वेळ घालवतोय. अॅस्ट्रॉलॉजी आणि होमिओपॅथीची मला आवड असल्यामुळे तीही पुस्तके वाचत आहे. होमिओपॅथीमध्ये बऱ्याच पद्धती दिल्या आहेत, परंतु त्या कोरोनासाठी किती उपयोगी आहे हे त्याचा वापर केल्यानंतर समजू शकते, कारण कोरोना व्हायरसचे संकट तर पहिल्यांदाच आले आहे.’

  • सलमानने 16 हजार कामगारांच्या खात्यात जमा केले पैसे

सलमान खानने लॉकडाऊनदरम्यान सिनेमा उद्योगातील 25 हजार कामगारांचा खर्च उचलणार असे सांगितले होते. यासाठी त्याने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (एफडब्ल्यूआईसीई) कडून 19 हजार कामगारांच्या बँक खात्यांची माहिती मागितली होती. ती त्याला मिळाली असून त्याने त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. एफडब्ल्यूआईसीईचे महासचिव अशोक दुबे यांनी सांगितले की, सलमानने 25 हजार कामगारांची माहिती मागितली होती आणि आम्हाला 19 हजार सदस्यांची माहिती मिळाली आहे. यातील तीन हजार कामगारांना अगोदरच यशराज फिल्म्सकडून पाच हजार रुपये मिळाले आहेत. म्हणून आम्ही उर्वरित 16 हजार कामगारांची माहिती सलमान खानला पाठवली आहे आणि त्याने पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच सर्वांना पैसे मिळतील.

बातम्या आणखी आहेत...