आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकलिनला थाटायचे होते सुकेशशी लग्न:सलमान-अक्षयने दिला होता सुकेशपासून दूर राहण्याचा सल्ला, जॅकलिनच्या मॅनेजरला सुकेशने दिली होती महागडी बाईक!

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) बुधवारी ठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसची चौकशी केली होती. आता या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. अक्षय कुमार आणि सलमान खान यांनी जॅकलिनला सुकेशपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता पण तिने त्यांचे ऐकले नाही, असा दावा तपास पथकातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. जॅकलिनने स्वतः अक्षय आणि सलमानला सांगितले होते की, तिला सुकेशशी लग्न करायचे आहे आणि तो एक व्यापारी आणि राजकारणी आहे.

सुकेशने जॅकलिनच्या मॅनेजरला दिली होती बाईक
फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख रवींद्र यादव म्हणाले, जॅकलिनला तिच्या सहकलाकारांनी सुकेशच्या भानगडीत पडू नको, असा सल्ला दिला होता, तरीही जॅकलिनने कोणाचेही ऐकले नाही आणि तिने सुकेशसोबतचे नाते तोडले नाही. ती ठग सुकेशला भेटत राहिली आणि त्यांच्याकडून महागड्या भेटवस्तूही घेत राहिली. जॅकलिनला इम्प्रेस करण्यासाठी सुकेशने तिचा मॅनेजर प्रशांतला डुकाटीला बाईकही दिली, जी आता जप्त करण्यात आली आहे. या बाईकची किंमत 8 लाख रुपये आहे.

जॅकलिनला ठाऊक होते सुकेशचे सत्य, तरीही नाते तोडले नाही

रिपोर्ट्सनुसार, सुकेश स्वप्नांतील राजकुमार असून मला त्याच्याशी लग्न करायचे होते, असा खुलासा जॅकलिनने EOW कडे केला होता. यापूर्वी ईडीच्या चौकशीदरम्यान देखील जॅकलिनने सुकेशसोबतच्या नात्याची कबुली दिली होती. रिपोर्ट्सनुसार, जॅकलिनने सुकेशकडून करोडोंच्या गिफ्ट्स घेतल्याची कबुलीही दिली होती. सुकेशने तिला हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केले होते. या रिंगमध्ये J आणि S हे अक्षर कोरले होते.

हे खासगी फोटो ईडीने पुरावा म्हणून न्यायालयात सादर केले आहेत.
हे खासगी फोटो ईडीने पुरावा म्हणून न्यायालयात सादर केले आहेत.

जॅकलिन-सुकेश रिलेशनशिपमध्ये होते

मीडिया रिपोर्ट्सनुरास ईडीच्या मते, सुकेश फसवणुक करणारा आहे, हे जॅकलिनला आधीपासूनच ठाऊक होते. दोघे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचे अनेक खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यानंतर ईडीने जॅकलिनची चौकशी केली होती आणि दोघांचे फोटो पुरावा म्हणून ठेवले.

सुकेशने 9-9 लाख रुपयांच्या मांजरी जॅकलिनला भेट म्हणून दिल्या होत्या.
सुकेशने 9-9 लाख रुपयांच्या मांजरी जॅकलिनला भेट म्हणून दिल्या होत्या.

सुकेशच्या गिफ्ट्समुळे अडचणीत आली जॅकलिन
रिपोर्टनुसार, जॅकलिनने चौकशीदरम्यान सांगितले की, मी सुकेशकडून कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू घेतल्या होत्या. कारण आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. सुकेशने मला हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केले होते. या रिंगमध्ये J आणि S बनवले होतेले. सुकेशने जॅकलिनला एस्पुएला नावाचा घोडा, गुच्चीच्या 3 डिझायनर बॅग, गुच्चीच्या 2 जिम वेअर, लुई विटॉचे एक जोडी शूज, 2 जोडी डायमंड कानातले आणि एक रुबी ब्रेसलेट, दोन हेमीज ब्रेसलेट आणि एक मिनी कूपर कारचा समावेश आहे.

कोण आहे कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर?
सुकेश चंद्रशेखर हा बंगळुरू येथील रहिवासी आहेत. लॅव्हिश लाइफस्टाइल जगण्यासाठी त्याने वयाच्या 17 व्या वर्षापासून लोकांची फसवणूक सुरू केल्याचे सांगितले जाते. बंगळुरूमध्ये फसवणूक केल्यानंतर त्याने चेन्नई आणि इतर शहरातील लोकांनाही टार्गेट केले.

सुकेश हा उच्चभ्रू लोकांना फोन करायचा आणि स्वतः मोठा सरकारी अधिकारी असल्याचे सांगायचा. 2007 मध्ये त्याने बंगळुरू डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात 100 हून अधिक लोकांची फसवणूक त्याने केली होती, यावेळी त्याने स्वत:ला बडा सरकारी अधिकारी असल्याचे सांगितले होते. याप्रकरणी सुकेशला अटकही करण्यात आली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर सुकेशने पुन्हा लोकांना फसवण्याचे काम सुरू ठेवले. सुकेशवर 30 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

तामिळनाडूमध्ये तो स्वत:ला माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचा मुलगा असल्याचे सागंत होता. त्याने स्वतःला आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचा पुतण्या असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...